Thursday, January 15, 2026

अभिनेता इमरान हाश्मीला डेंग्यूची लागण

अभिनेता इमरान हाश्मीला डेंग्यूची लागण
मुंबई : बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता इमरान हाश्मी याला नुकतेच डेंग्यूचे लागण झाल्याचे समोर आले आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच देशात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ लागते, त्यामुळे खबरदारी घेणे आवश्यक आहे. इमरान सध्या तेलुगू चित्रपट 'ओजी'च्या शूटिंगमध्ये व्यस्त होता, याच दरम्यान त्याला थकवा आणि ताप यासारखी लक्षणे जाणवली. तपासणीनंतर त्याला डेंग्यू झाल्याचे निदान झाले.
काही काळासाठी चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले असून, सध्या इमरान विश्रांती घेत आहेत ; परंतु हा रोग कोणालाही होऊ शकतो. विशेषतः पावसाळ्यात ही शक्यता अधिक असते. त्यामुळे डेंग्यूची लक्षणे ओळखणे आणि प्रतिबंधात्मक उपाय माहित असणे गरजेचे आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >