Saturday, October 25, 2025
Happy Diwali

अहिल्यादेवींच्या विचारांशी सुसंगत असा सांस्कृतिक महोत्सव : मंत्री राधाकृष्ण विखे

अहिल्यादेवींच्या विचारांशी सुसंगत असा सांस्कृतिक महोत्सव : मंत्री राधाकृष्ण विखे

अहिल्यानगर:अहिल्यादेवीच्या विचारांशी सुसंगत असा सांस्कृतिक महोत्सव आयोजित करून जिल्ह्याचा सांस्कृतिक नावलौकीक अधिक उंचावण्याचा यशस्वी प्रयत्न विचार भारती आणि जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून झाला असल्याचे गौरवोद्गार जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटीलयांनी काढले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तिनशे व्या जयंतीचे औचित्य साधून विचार भारती आणि जनसेवा फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अहील्यानगर गौरव आणि पालकमंत्री महोत्सवाचे उद्घाटन ना.विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले.याप्रसंगी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, अहील्यादेवी होळकर यांचे नाव देवून जिल्ह्याचा गौरव झाला.मात्र अहील्यादेवी मांडलेल्या विचारांचा वस्तूपाठ नव्या पिढी समोर आणायचा असेल तर त्यांच्या विचाराने आपल्याला वाटचाल करावी लागेल.अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट भारतीय इतिहासातील एक तेजस्वी अध्याय असल्याचा उल्लेख करून मंत्री विखे पाटील म्हणाले की,त्यांचे कार्य केवळ राज्यापुरते सिमीत नव्हते तर संपूर्ण भारत वर्षासाठी प्रेरणादायी ठरले.धर्म न्याय आणि सामाजिक सुधारणा आणि भारतीय संस्कृतीचे पुनरूत्थान करण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान खूप महत्वाचे आहे.

जिल्ह्याचा सुपूत्री असल्याचा अभिमान आपल्या सर्वाना आहेच,परंतू यापेक्षाही महत्वाचे म्हणजे सामाजिक सुधारणातून महीलांच्या सबलीकरणाचा पाया त्यांनी अधिक मजबूत केला.हीच प्रेरणा घेवून शहरामध्ये त्यांचे भव्य स्मारक उभारून महीलासांठी काम सूरू करणार असल्याचे सुतोवाच पालकमंत्री विखे पाटील यांनी केले.

जिल्हयाला लाभलेला सांस्कृतिक वारसा या महोत्सवातून अधोरेखीत झाला असून, जिल्ह्यातील कलाकारांनी यामध्ये दिलेले योगदान खूप कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.अहिल्यादेवीच्या प्रत्येक जयंतीदिनाला असा महोत्सव आयोजित करून हा जिल्हा अहील्यादेवी होळकर यांच्या विचारांवर वाटचाल करणारा असल्याचा संदेश देण्यासाठी भविष्यात प्रयत्नशील राहण्याची ग्वाही मंत्री विखे पाटील यांनी दिली.महोत्सवात झालेल्या यशस्वी स्पर्धक आणि कलाकारांचा मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देवून सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमास विचार भारतीचे राजाभाऊ मुळे अरूण कुलकर्णी महोत्सव समितीच्या सौ.धनश्री विखे पाटील माजी महापौर बबासाहेब वाकळे,निखिल वारे,धनंजय जाधव यांच्यासह विचार भारतीचे तसेच महोत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >