
मुंबई (खास प्रतिनिधी) : कांदिवली (पूर्व) येथील ठाकूर संकुलद्वार, पश्चिम द्रुतगती महामार्ग येथे ९०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीसोबत ९०० मिलिमीटर व्यासाची अन्य जलवाहिनी जोडणे व ९०० मिलिमीटर व्यासाची झडप बसविणे ही कामे हाती घेण्यात येणार आहेत. सोमवार, २ जून २०२५ रोजी दुपारी १.३० वाजेपासून मंगळवार, ३ जून २०२५ रोजी सकाळी ७.३० वाजेपर्यंत हे काम करण्याचे नियोजित आहे. या कालावधीत म्हणजे सोमवार, २ जून २०२५ रोजी दुपारी १.३० वाजेपासून मंगळवार, दिनांक ३ जून २०२५ रोजी सकाळी ७.३० वाजेपर्यंत संपूर्ण जलवाहिनीचा पाणीपुरवठा बंद करावा लागणार आहे.

नाशिक : आपल्या पदानुसार किंवा आपल्या कामानुसार आपल्याला एका टोपण नावाने ओळखले जाते,जसे रुग्णांना बरे करतात त्यांना डॉक्टर,शाळेत किंवा कॉलेज मध्ये ...
दुरुस्तीच्या प्रत्यक्ष कालावधीत कांदिवलीत आर दक्षिण विभागातील खालील परिसरांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही. कृपया संबंधित विभागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच पाणीपुरवठा बंदच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
या विभागांत पाणीपुरवठा बंद
आर दक्षिण विभाग : ठाकूर गाव, समता नगर म्हाडा, चिखलवाडी, जानूपाडा, कांदिवली (पूर्व) (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ - सायंकाळी ६.२५ ते रात्री ८.२५) ( २ जून २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील.