
थायलंडच्या फुकेत येथे भारतीय पर्यटकावर वाघाचा हल्ला
फुकेत: सोशल मिडियावर अलीकडेच एक भयंकर व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक भारतीय तरुण वाघाला घेऊन फिरताना दिसतो, दरम्यान तो वाघाच्या पाठीवरून हात फिरवतो, आणि त्याच्यासोबत सेल्फी काढणार तोच वाघ त्या व्यक्तीवर हल्ला करतो. हा व्हिडिओ पहाणाऱ्यांचा थरकाप उडवतो. मुळात, हा व्हिडिओ थायलंडच्या फुकेत येथील टायगर किंग्डममधला आहे, थायलंडच्या फुकेत येथे जगभरातून अनेक पर्यटक टायगर किंग्डमला भेट देत असतात. याठिकाणी वाघाला प्रत्यक्ष समोरासमोर पाहता येतं. वाघाला हात लावता येतो आणि फोटोही काढता येतो. मात्र, अलीकडे व्हायरल झालेला व्हिडिओ पाहता टायगर किंग्डममधील वाघासोबत सेल्फीच काय तर त्याच्या जवळपास जाण्याचादेखील कोणीच धाडस करणार नाही. एक्स (पूर्वीचा ट्विटर) वर सिद्धार्थ शुक्ला नामक व्यक्तीने सदर घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ इतका भयावह आहे की, ज्या व्यक्तीच्या अंगावर वाघाने हल्ला केला, त्याच्या किंकाळ्या ऐकूनच थरकाप उडेल.पहा व्हिडिओ-
व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले, "थायलंडमध्ये एका भारतीय पर्यटकावर वाघाने हल्ला केला. हे जगातले असे ठिकाण आहे, जिथे वाघांना पाळीव प्राण्यांप्रमाणे वागवले जाते. पर्यटक त्यांच्याबरोबर सेल्फी काढू शकतात, त्यांना अन्न भरवू शकतात इत्यादी.."Apparently an Indian man attacked by a tiger in Thailand.
This is one of those paces where they keep tigers like pets and people can take selfies, feed them etc etc.#Indians #tigers #thailand #AnimalAbuse pic.twitter.com/7Scx5eOSB4 — Sidharth Shukla (@sidhshuk) May 29, 2025