संतापजनक! भारताविरोधात गरळ ओकणाऱ्या शाहिद अफ्रिदीचा भारतीयांकडूनच सन्मान, Video होतोय व्हायरल

दुबई: सध्या भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थिती खूपच तणावपूर्ण आहे. पहलगाम दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील (India Pakistan Tension) संबंध बिघडले आहे. दरम्यान माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीने (Shahid Afridi) भारताविरुद्ध गरळ ओकली होती. त्याने भारतीय सैन्यांच्या सामर्थ्यावर शंका उपस्थित केली होती. त्यामुळे भारतीयांमध्ये शाहिद आफ्रिदीबद्दल प्रचंड संताप निर्माण झाला. इतकं सगळं असताना शाहिद आफ्रिदीचा एक व्हिडिओ समोर येत आहे, ज्यामध्ये भारतीयांकडूनच त्याचे जंगी स्वागत होताना दिसून येते, जे निश्चितच सर्वांसाठी आश्चर्यकारक आहे.


पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आणि कर्णधार शाहिद आफ्रिदीने अनेकदा भारत पाक तणावादरम्यान भारताविरुद्ध टिप्पणी केली आहे. पहलगाम हल्ल्याचा संपूर्ण जग निषेध करत असताना, आणि पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांना विरोध करत असताना, शाहीद आफ्रिदीने नेहमीप्रमाणे पाकिस्तानची बाजू उचलून धरली होती, जी भारतीयांना पुरती खटली. ज्यामुळे आताही त्याच्याबद्दल भारतीयांच्या मनात  प्रचंड संताप आहे. मात्र, असे असताना दुबईतील भारतीय केरळ समुदायाने त्यांच्या एका कार्यक्रमात आफ्रिदीचे जंगी स्वागत केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सादर झाल्यानंतर, भारतीय नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.





दुबईमध्ये केरळ समुदायाच्या कार्यक्रमात शाहिद आफ्रिदीचे जंगी स्वागत


सोशल मिडियावर प्रदर्शित झालेला हा व्हिडिओ दिनांक 25 मे चा आहे. दुबईस्थित असलेल्या भरतातील केरळ समुदायाच्या सदस्यांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता, ज्यामध्ये शाहिद आफ्रिदीला देखील आमंत्रित करण्यात आले होते. कहर म्हणजे, आफ्रिदी हॉलमध्ये प्रवेश करताच केरळी सदस्यांनी त्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम थांबवला आणि बूम-बूम असे ओरडण्यास सुरुवात केली. कार्यक्रमात आफ्रिदीला पाहताच लोकांनी जल्लोष करायला सुरुवात केली.



भारत सरकारने आफ्रिदीच्या यूट्यूब चॅनेलवर घातली बंदी


पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या केंद्र सरकारने पाकिस्तानबाबत अनेक कठोर निर्णय घेतले, ज्यामध्ये त्यांनी अशा यूट्यूब चॅनेलवर देखील बंदी घातली. जी सतत त्यांच्या वक्तव्यांद्वारे भारताविरुद्ध विष ओकतात, ज्यामध्ये शाहिद आफ्रिदीचा चॅनेल देखील समाविष्ट होता. याशिवाय, इतर अनेक पाकिस्तानी खेळाडूंच्या चॅनेलवर देखील बंदी घालण्यात आली होती, ज्यामध्ये शोएब अख्तरचे नाव देखील होते. त्यामुळे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर केरळ समुदायाच्या सदस्यांना देखील भारतीयांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे.

Comments
Add Comment

सुशीला कार्की नेपाळच्या नव्या हंगामी पंतप्रधान

नेपाळची संसद बरखास्त, हंगामी सरकारचे नेतृत्व करणार नवी दिल्ली : नेपाळमध्ये मागील काही दिवसांपासून मोठ्या

‘या’ देशातील ९९ टक्के लोक वापरत नाहीत सोशल मीडिया

इंटरनेट सुविधा अत्यंत मर्यादित नैरोबी : आजकाल प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन दिसतो, ज्यात सोशल मीडियावर लोक

रशियामध्ये महाभयंकर भूकंप! त्सुनामीचा इशारा जारी

मॉस्को: शनिवारी रशियाच्या कामचटका द्वीपकल्पाच्या पूर्व किनाऱ्याजवळ भूकंपाचे धक्के बसले आहेत, ज्याची तीव्रता

काँगोमध्ये बोट उलटल्या, १९३ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये बहुतेक विद्यार्थी

काँगो: आफ्रिकन देश काँगोमधून एक मोठी बातमी येत आहे. येथील वायव्य इक्वेटूर प्रांतात झालेल्या दोन वेगवेगळ्या बोट

माजी सरन्यायाधीश सुशील कार्की यांच्या हाती नेपाळचे नेतृत्व, राष्ट्रपतींनी दिली शपथ

काठमांडू: नेपाळमधील राजकीय अस्थिरता आणि 'जनरेशन झेड' (Gen-Z) तरुणाईच्या जोरदार आंदोलनानंतर अखेर

Nepal News : भारतीय पर्यटकांवर नेपाळमध्ये हल्ला; प्रवाशांचे मोबाईल-रोख रक्कम लुटली अन् सर्वांना तातडीनं...

काठमांडू : नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीविरोधात सुरू झालेल्या आंदोलनाला आता हिंसक वळण मिळालंय. गेल्या काही