Saturday, October 25, 2025
Happy Diwali

‘नीट-पीजी’ची आता एकाच शिफ्टमध्ये परीक्षा

‘नीट-पीजी’ची आता एकाच शिफ्टमध्ये परीक्षा

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली :सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (दि. ३०) नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनला नीट-पीजी परीक्षा २०२५ परीक्षा एकाच शिफ्टमध्ये घेण्याचे निर्देश दिले. सर्वोच्च न्यायालयाने एनबीईचा नीट-पीजी परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्याचा निर्णय फेटाळून लावला. कारण अशा पद्धतीच्या परीक्षेमुळे मनमानी होईल, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

नीट-पीजी परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्याच्या एनबीईच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. या याचिकांवरील सुनावणी करताना न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यायमूर्ती एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.

एकाच शिफ्टमध्ये परीक्षा आयोजित करण्यासाठी पुरेशी केंद्रे नसल्याचा एनबीईचा दावा न्यायालयाने फेटाळून लावला. ही परीक्षा केवळ एका शहरात नाही, तर संपूर्ण देशभरात घेतली जात आहे. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने याआधी निर्देश जारी केले होते. प्रवेशासाठी समुपदेशन करण्यापूर्वी महाविद्यालयांनी प्रवेश शुल्क जाहीर करावी, असे निर्देश न्यायालयाने दिले होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा