Fly91: सिंधुदुर्ग विमानतळावरून ११ जून पासून मिळणार हैद्राबाद आणि बंगलोर विमान सेवा

फ्लाय ९१ कंपनीचा निर्णय : प्रवाशांसाठी बुकिंग उपलब्ध


सिंधुदुर्ग: "फ्लाय ९१" कंपनीची सिंधुदुर्ग हैद्राबाद आणि बंगलोर विमान फेरी सेवा ११ जून पासून सुरू होणार आहे. कंपनी तर्फे विमानसेवेची प्रवाशांना बुकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. लवकरच या दोन सेवा सुरू होतील, त्यामुळे प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन कंपनीतर्फे करण्यात आले आहे.


वेंगुर्ले तालुक्यातील चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळावर सध्या या कंपनीची सिंधुदुर्ग पुणे विमान फेरी आठवड्यातून पाच दिवस सुरू आहे. त्यातच कंपनी तर्फे हैद्राबाद आणि बंगलोर सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना या दोन विमान फेरी चा लाभ घेता येणार आहे. सिंधुदुर्ग विमानतळावर विमानसेवा सिग्नल व्यवस्था आता व्यवस्थित सक्षम करण्यात आली आहे, त्यामुळे आता वातावरणातील बदलामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी येत नाहीत. त्यामुळे प्रवाशांना त्याचा त्रास देखील होत नाही. लवकरच सिंधुदुर्ग मुंबई ही विमान सेवा सुरू झाली तर प्रवासी वर्गाला त्याचा मोठा फायदा होऊ शकतो.


फ्लाय ९१ च्या अधिकृत संकेतस्थळ वर हैद्राबाद आणि बंगलोर सेवा बुकिंग सुरू झाले आहे. याचे तिकीट २४९१/-एवढे असणार आहे आठवड्यातून चार दिवस या सेवा असतील, असे कंपनीकडून जाहीर केले आहे.

Comments
Add Comment

स्व. मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक

मुंबई: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी स्व. मीनाताई ठाकरे यांच्या दादर येथील

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींचा पोलिसांकडून एन्काऊंटर

मुंबई: अभिनेत्री दिशा पटानीच्या बरेली येथील घरावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये

मोठा प्रश्न? कावळेच नाहीत! पितृपक्षात वाडीला शिवणार कोण?

मुंबई : हिंदू धर्मातील पितृपक्ष काळात पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण करणे हा पवित्र संस्कार आहे. या काळात घराघरांत

Asia Cup 2025: पाकिस्तानची नाटकं काही चालेना, UAE विरुद्ध सामन्याला ९ वाजता होणार सुरूवात

दुबई: आशिया कप २०२५मध्ये आज १०वा सामना पाकिस्तान आणि यजमान यूएई यांच्यात खेळवला जाणार आहे. मात्र या सामन्याच्या

१ कोटी लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार - मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर :  प्रत्येक गावात जिल्हा बॅंकेमार्फत लाडक्या बहिणींना बिनव्याजी एक लाख रुपयांचे कर्ज देऊन