Dagdusheth Ganpati : उत्सुकता नव्या रूपाची...गणेशोत्सवात 'दगडूशेठ' गणपती 'ही' प्रतिकृती साकारणार!

पुणे : पुण्यातील 'दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती' भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदा पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट गणेशभक्तांना एका अनोख्या अनुभवाची भेट देण्यास सज्ज आहे. १३३ व्या वर्षाच्या गणेशोत्सवात, ट्रस्टने यंदा केरळमधील तिरुअनंतपुरम येथील श्री पद्मनाभस्वामी मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्याचा निर्णय घेतला आहे. या थीमच्या शुभारंभ सोहळ्याने पुण्यातील गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.



तिरुअनंतपुरम येथील श्री पद्मनाभस्वामी मंदिराची प्रतिकृती साकारणार


केरळमधील श्री पद्मनाभस्वामी मंदिर हे भगवान विष्णूंना समर्पित असलेले एक पवित्र हिंदू मंदिर आहे. श्री वैष्णव परंपरेतील १०८ दिव्य देसमांपैकी एक म्हणून या मंदिराला विशेष महत्त्व आहे. या मंदिराची भव्यता आणि आध्यात्मिक तेज यंदा दगडूशेठ गणपतीच्या मंडपात साकारले जाणार आहे. ही प्रतिकृती केवळ दृश्यात्मकच नव्हे, तर भाविकांना एक आध्यात्मिक अनुभव देणारी ठरणार आहे. सणस मैदानासमोरील हिराबाग कोठी येथील ट्रस्टच्या सजावट विभागात या थीमची घोषणा आणि शुभारंभ सोहळा नुकताच पार पडला.





अशी असणार पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती


गेली अनेक वर्षे विविध मंदिरांची उत्कृष्ट प्रतिकृती सजावटीतून साकारण्याकरीता ट्रस्ट प्रयत्नशील राहिले आहे. यंदा ज्या पद्मनाभ मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे, ते मंदिर केरळ शैली आणि द्रविड शैलीच्या वास्तुकलेचे गुंतागुंतीचे मिश्रण करून बांधले गेले आहे. पद्मनाभ स्वामी मंदिराच्या प्रतिकृतीत ५ थरांचा गोपुर असणार आहे. त्यामध्ये कृष्णलीला, रामायण, सप्तऋषी, घोडे, हत्ती, सिंह साकारण्यात येणार आहेत. तर, गाभाऱ्यात विष्णू लक्ष्मी, शिवपार्वती, श्रीकृष्ण आणि नृसिंह यांच्या मूर्ती असणार आहे. मुख्य मखराच्या वरच्या बाजूस अष्टकोनी भागामध्ये भगवान पद्मनाभ स्वामींची भव्य निद्रिस्त मूर्ती साकारण्यात येणार आहे. नानाविध वैशिष्टयांनी परिपूर्ण असलेल्या मंदिराची प्रतिकृती सुमारे १०० फूट इतकी असणार आहे.



भव्य आणि अविस्मरणीय दर्शनाचा अनुभव


सजावट विभागात आयोजित शुभारंभ सोहळ्याला कलादिग्दर्शक विनायक रासकर आणि सरिता रासकर यांच्या हस्ते सुरुवात झाली. यावेळी ट्रस्टचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्याने गणेशोत्सवाच्या तयारीला अधिकच गती मिळाली आहे. सजावटीचे काम आता जोमाने सुरू झाले असून, यंदा भाविकांना एक भव्य आणि अविस्मरणीय दर्शनाचा अनुभव मिळणार आहे.



तिनही दरवाज्यांमधून घेणार दर्शन


पद्मनाभ स्वामींचे दर्शन तीन दरवाज्यांमधून घेता येणार आहे. पहिल्या दरवाज्यातून पद्मनाभ आणि त्याच्या हाताखाली शिवलिंगाचे रूप दिसेल. तर दुसऱ्या दरवाज्यातून पद्मनाभ, श्री देवी आणि भूदेवी यांच्या सोन्याच्या अभिषेक मूर्ती व पद्मनाभ स्वामींची चांदीची उत्सव मूर्ती पाहायला मिळेल. तर तिसऱ्या दरवाज्यातून देवतेचे चरण आणि भूदेवी व मार्कंडेय मुनी यांचे दर्शन होईल. अशा केरळमधील विलोभनीय पद्मनाभस्वामी मंदिराची प्रतिकृती सन २०२५च्या गणेशोत्सवात देश-विदेशातील गणेशभक्तांना पुण्यात पाहायला मिळणार आहे.

Comments
Add Comment

छत्रपती संभाजीनगर : फडणवीसांच्या दौर्‍याने राजकीय वातावरण तापलं

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या भाजपच्या कार्यक्रमामुळे संपूर्ण शहरात राजकीय हालचालींना

येणारा काळ आयुर्वेदाचा सुवर्णकाळ : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : आयुर्वेद या निसर्गाशी अनुरुप उपचार पद्धतीचे महत्त्व जगभरात मान्य झाले आहे. आयुष

स्वामी रामनंद तीर्थ यांचे मराठवाडा मुक्ती संग्रामात अमूल्य योगदान : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ यांनी तरुणाईमध्ये देशभक्ती जागृत

सततच्या अपघातांमुळे नवले पूल परिसर ‘मृत्यूचा सापळा’

पाच वर्षांत २५७ अपघात; ११५ जणांचा बळी पुणे  : नवले पूल परिसरातील प्राणांतिक अपघातांची साखळी थांबण्याचे नाव घेत

‘डॉक्टर नसलो,… पण मोठी ऑपरेशन मी करतो!’

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाबळेश्वरमध्ये जोरदार फटकेबाजी महाबळेश्वर : “मी पेशाने डॉक्टर नाही… पण

आदिवासींच्या जल, जंगल, जमीन आणि संस्कृतीचे रक्षण करू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन  राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन नागपूर : राज्य