Car Parking Cpllapses: बोरिवलीत कार पार्किंग लिफ्ट कोसळून तरुणाचा मृत्यू, तर एक गंभीर जखमी

मुंबई: बोरिवली पश्चिम येथील लिंक रोडवरील ओम प्रथमेश या २१ मजली गगनचुंबी इमारतीची कार पार्किंग लिफ्ट कोसळून शुभम मदनलाल धुरी (वय-३०) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तर एक जण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे.


बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, बोरिवली (पश्चिम) येथील लिंक रोडवरील ओम प्रथमेश इमारतीतील कार पार्किंगची लिफ्ट शनिवार, ३१ मे रोजी सकाळच्या सुमारास कोसळून झालेल्या अपघातात शुभम धुरी या एका तरुण मजूराचा मृत्यू, तर अन्य एक मजूर जखमी झाला. सुनजीत यादव (वय-४५) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.  त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना आज सकाळी ११ वाजता घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते.


लिफ्टमध्ये अडकलेल्या दोघांना तात्काळ बाहेर काढण्यात आले, आणि गंभीर जखमी झालेल्या शुभमला पोलीस व्हॅनमधून बीडीबीए शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तर सुनजीत यादव यांच्या डोक्याला दुखापत झाल्याने पुढील उपचारासाठी त्यांच्यावर सीटी स्कॅन करण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

Comments
Add Comment

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून