Bullet Train Shinkansen : भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची चाचणी सुरु! अवघ्या २ तासांत मुंबईहून अहमदाबाद…

जपान : भारताला जपानकडून शिंकानसेन मालिकेतील E५ आणि E३ मॉडेलच्या दोन बुलेट ट्रेन भेट म्हणून मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल (MAHSR) प्रकल्पांतर्गत जपानमध्ये प्रथमच शिंकानसेन बुलेट ट्रेनची चाचणी सुरु झाली आहे. भारतीय गरजा लक्षात घेऊन ही चाचणी केली जात आहे. जेव्हा या गाड्या भारतात येतील तेव्हा त्या स्थानिक वातावरणातही चांगली कामगिरी करू शकतील. हा प्रकल्प २०२६ पर्यंत भारतात राबवला जाणार आहे आणि पहिल्या २ गाड्या जपानकडून भारताला भेट म्हणून दिल्या जातील अशी माहिती समोर आली आहे.



जपानकडून भारताला भेट


या प्रकल्पांतर्गत, भारताला शिंकानसेन मालिकेतील E५ आणि E३ मॉडेलच्या दोन ट्रेन मिळतील. या गाड्या ताशी ३२० किलोमीटर वेगाने धावू शकतात. सध्या, जपानमध्ये या गाड्यांची चाचणी सुरू आहे. ट्रेनची क्षमता, सुरक्षितता, तापमान आणि धूळ प्रतिरोधकता यासारख्या ट्रेनच्या अनेक वैशिष्ट्यांची चाचणी केली जात आहे. २०२६या वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा या गाड्या भारतात येतील तेव्हा येथील जमीन आणि हवामानानुसार त्यांची चाचणी देखील केली जाईल.



'मेक इन इंडिया' ला मिळणार चालना


जपान टाइम्सच्या रिपोरेटनुसार, या बुलेट ट्रेनच्या ट्रायलमधून जो डेटा मिळेल, त्याचा उपयोग भारतातच नव्या पिढीच्या E१० सीरिजमधील बुलेट ट्रेन बनवण्यासाठी केला जाईल. यामुळे “मेक इन इंडिया” ( Make in India) उपक्रमांतर्गत टेक्निकल ट्रान्सफर आणि स्वावलंबनाला प्रोत्साहन मिळेल.



२ तास ७ मिनिटांत पार पडणार प्रवास


या ५०८ किलोमीटर लांबीच्या कॉरिडॉरमध्ये, मुंबई ते अहमदाबाद हा प्रवास फक्त २ तास ०७ मिनिटांत पूर्ण होईल. या मार्गावर १२ स्थानके असतील, ज्यामध्ये ठाणे, विरार, वापी, सुरत आणि वडोदरा या शहरांचा समावेश आहे. २०१६ मध्ये भारत आणि जपान यांच्यात झालेल्या कराराचा हा प्रकल्प एक भाग आहे, ज्यामध्ये जपान स्वस्त येन कर्जाच्या स्वरूपात ८० टक्के खर्च देत आहे.



रेल्वेचे भविष्य बदलणार


या प्रकल्पामुळे केवळ जलद प्रवासाचेच साधन मिळणार नाही तर रोजगार, पर्यटन, तांत्रिक विकास आणि व्यापारालाही मोठी चालना मिळणार आहे. एकदा बुलेट ट्रेन सुरू झाली की, भारतातील रेल्वेचे भविष्य पूर्णपणे बदलून जाईल, असं म्हंटल जातंय.

Comments
Add Comment

ऐतिहासिक! भारत आणि इस्त्राईलमध्ये मुक्त व्यापार करार, सर्व्हीस सेक्टरला होणार फायदा

तेल अवीवः तेल अवीवमध्ये भारत आणि इस्राईलचा संबंध घट्ट करणारी ऐतिहासिक घटना घडली आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच

नेपाळमध्ये पुन्हा पेटलं जेन झी चं आंदोलन

काठमांडू : नेपाळमध्ये पुन्हा जेन झी आंदोलन पेटलं आहे. देशातील तरुणाई पुन्हा रस्त्यावर उतरली आहे. परिस्थिती

लष्कर प्रमुखांचे विधान आणि पाकिस्तानचा उडाला थरकाप! म्हणाले, भारत कधीही घुसखोरी करू शकतो...

लाहोर: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे पाहायला मिळाले. भारताने

लाल किल्ल्यापासून काश्मीरपर्यंत हल्ले आम्हीच केले!

नवी दिल्ली  : दिल्लीतील लाल किल्ल्याबाहेर १० नोव्हेंबर रोजी झालेल्या कार बॉम्बस्फोटात १५ लोक ठार व डझनहून अधिक

ट्रम्पच्या गाझा शांतता योजनेला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून मंजुरी

अमेरिका: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या गाझा शांतता योजनेला संयुक्त राष्ट्र सुरक्षा

मिठी मारण्याचा बिझनेस! फक्त ५ मिनिटांसाठी ६०० रुपये!

चीनच्या मोठ्या शहरांमध्ये सध्या एक नवीन आणि वेगळा सोशल ट्रेंड खूप चर्चेत आहे. त्याचे नाव आहे 'मॅन मम'. या