Thursday, October 30, 2025
Happy Diwali

स्मृती इराणी झेड प्लस सिक्योरिटीमध्ये करणार मालिकेत काम

स्मृती इराणी झेड प्लस सिक्योरिटीमध्ये करणार मालिकेत काम

'क्योंकि सास भी कभी बहू थी' सिझन-२'ची घोषणा

मुंबई :'क्योंकि सास भी कभी बहू थी'च्या सीझन २ ची घोषणा झाली आहे. या मालिकेची घोषणा झाल्यापासूनच शोचे कास्टसंदर्भात चाहते अत्यंत उत्सूक आहेत. तुलसी म्हणजेच स्मृती ईराणी आणि अभिनेता अमर उपाध्याय शोमध्ये पुन्हा येणार, अशी चर्चा होती. मात्र आता, स्मृती ईराणी झेड प्लस सिक्यूरिटीमध्ये शोचे शूटिंग करणार, असे वृत्त आहे. महत्वाचे म्हणजे, सेट वरील प्रत्येकाचे फोन टॅप केले जातील, असेही वृत्त आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, स्मृती इराणी झेड प्लस सुरक्षेत मालिकेचे शूटिंग करतील. शोच्या सेटवर लोकांना येण्या-जाण्यास बंदी असेल. याच वेळी, सेटवर जवळजवळ प्रत्येकाचे फोन टॅप केले जातील. मालिकेशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "अमर सर, स्मृती मॅम आणि एकता मॅम वगळता सर्वांचे फोन टॅप केले जातील. सेटवर कोणालाही फोन वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही. स्मृती इराणी झेड प्लस सुरक्षेत मालिकेचे शूटिंग करतील. सर्वांना सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करावे लागेल."

'क्योंकी सास भी कभी बहू थी' ही स्टार प्लसवरील प्रसिद्ध मालिका होती. ही मालिका २००० मध्ये सुरू झाली. या शोमध्ये स्मृती इराणी यांची मुख्य भूमिका होती. स्मृती व्यतिरिक्त रोनित रॉय, हितेन तेजवानी आणि सुधा शिवपुरी सारखे कलाकार या शोमध्ये होते. हा शो २००० ते २००८ पर्यंत टीव्हीवर प्रसारित झाला.या शोने एकूण ४७ पुरस्कार जिंकले होते. हा शो एकता कपूर यांनी तयार केला होता.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा