Saturday, October 25, 2025
Happy Diwali

फटाक्याच्या कारखान्यात स्फोट, पाच ठार आणि वीस जखमी

फटाक्याच्या कारखान्यात स्फोट, पाच ठार आणि वीस जखमी
चंदिगड : पंजाबमधील श्री मुक्तसर साहिब जिल्ह्यातील एका गावात शुक्रवारी सकाळी फटाका कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटात पाच जणांचा मृत्यू झाला आणि वीस जण जखमी झाले. ही घटना सिंगावाली-कोटली मार्गावरील दोन मजली काखान्यात घडली. स्फोटामुळे कारखान्याची दोन मजली इमारत कोसळली. फटाका हाताळणीत हयगय झाल्यामुळे स्फोट झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. पण स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजलेले नाही. स्थानिक पोलीस स्फोट प्रकरणी तपास करत आहेत. फटाका कारखान्यातील स्फोटात जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांचे शवविच्छेदन केल्यानंर मृतदेह नातलगांच्या ताब्यात दिले जाणार आहेत. मृतांच्या कुटुंबियांना आणि जखमींना सरकारकडून मदत मिळण्याची शक्यता आहे. स्फोटाचे कारण जाणून घेण्यासाठी पोलिसांनी तज्ज्ञांच्या सहकार्याने तपास सुरू केला आहे. ताज्या घटनेमुळे फटाका कारखान्यांमध्ये सुरक्षेसाठीच्या नियमांचे पालन होते की नाही ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >