
कार्यकारी अभियंता वनमोरे यांना पालकमंत्री नितेश राणे यांनी सूचना केल्या. नियंत्रण कक्षाचे कामकाज अजून सुधारले पाहिजे, आलेली तक्रार संबंधितांपर्यंत तात्काळ जाणे अपेक्षित आहे यामध्ये कोणताही विलंब होऊ देऊ नका तसेच अनेक तास विद्युत पुरवठा खंडित राहू नये याकडे लक्ष द्या अशा सूचना दिल्या असे मंत्री नितेश राणे म्हणाले. याप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी तसेच महावितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्युत पुरवठ्या संदर्भात नागरिकांच्या तक्रारींसाठी कुडाळ येथील अधीक्षक अभियंता कार्यालयात स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षाला आज भेट दिली. यावेळी नियंत्रण कक्षाच्या कामकाजाची माहिती घेऊन त्यात आवश्यक त्या सुधारणा करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.… pic.twitter.com/8tMhDo3FXd
— Nitesh Rane (@NiteshNRane) May 30, 2025