
मुलासाठी आणि माहेराहून पैसे आणण्यासाठी होत होता मानसिक छळ
सोनमच्या वडिलांनी 1 मे रोजी दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नापासून मुलगा नसल्याने आणि माहेरून पैसे आणण्यासाठी सोनमचा सासरच्यांकडून सतत तिचा मानसिक छळ होत होता. या आधारावर पोलिसांनी पती अभिषेक केणी, सासू प्रभावती केणी आणि चार नणंदां विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पती आणि सासू फरार
सोनमने मुलीचा खून केला की दोघींचाही मृत्यू अन्य कारणाने झाला, याचा तपास पोलीस करत असून, सोनमची सुसाईड नोट व वैद्यकीय अहवालातून सत्य समोर येण्याची शक्यता आहे. या घटनेला महिना उलटूनही मुख्य आरोपी अभिषेक आणि त्याची आई प्रभावती फरार असल्याने सोनमच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त करत तातडीने कारवाईची मागणी केली आहे. तळोजा पोलिसांकडून सोमनच्या चारही नणंदांची चौकशी सुरू असून, फरार आरोपींच्या शोधासाठी तीन विशेष पथके तयार केली आहेत.