कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मुलाची निवड झाली आहे. नविद हसन मुश्रीफ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे अर्थात 'गोकुळ'चे नवे अध्यक्ष झाले आहेत. आज म्हणजेच शुक्रवार ३० मे रोजी दुपारी तीन वाजता झालेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या बैठकीत नव्या अध्यक्षांच्या निवडीची घोषणा झाली. ही घोषणा होताच नविद हसन मुश्रीफ यांच्या समर्थकांनी आणि हितचिंतकांनी जल्लोष केला.
मागील काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदावरुन उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. राजकीय वर्तुळातही कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात 'गोकुळ'च्या अध्यक्षपदावरुन उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेचा गंभीरपणे विचार करुन कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात 'गोकुळ'ने नव्या अध्यक्षांच्या निवडीची घोषणा केली. नविद हसन मुश्रीफ यांच्यामुळे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या अर्थात 'गोकुळ'च्या अध्यक्षपदी महायुतीच्या नेत्याची निवड झाली आहे.