GT vs MI, IPL 2025: 'करो वा मरो' अवस्थेत मुंबई आणि गुजरात

मुंबई(ज्ञानेश सावंत): पात्रता फेरीतील दुसरा सामना आज मुंबई विरुद्ध गुजरात चंदिगड येथे रंगणार आहे. दोन्ही संघ बलाढ्य असून दोन्ही संघांत दिग्गज खेळाडू आहेत. साखळीतील दोन्ही सामन्यांत गुजरात संधाने मुंबईचा पराभव केला, त्यामुळे आज त्यांचे पारडे जड आहे. शिवाय त्यांच्या संघात आयपीएल २०२५ मधील सर्वोत्तम फलंदाज, सर्वोत्तम गोलंदाज गुजरातचेच आहेत, त्यामुळे आज मुंबईची अवस्था 'करो या मरो अशी असेल.


मुंबई इंडियन्सला आजच्या सामन्यात पूर्वी केलेल्या चुका सुधराव्या लागतील. आजचा सामना त्यांना पूर्ण ताकदीनीशी खेळावा लागेल, समोरया संघ फलदाणी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर सरस आहे. आजच्या सामन्यात कर्णधार म्हणून हार्दिक पंड्याची भूमिका जास्त महत्वाची असणार आहे. एवढे सगळे असले तरीही मुंबई इंडियन्सच्या बाबतीत एक चांगला अनुभव म्हणजे मोक्याची वेळी हा संघ नेहमीच जबाबदारीने खेळतो व हरलेली बाजी समोरच्या संधावर पालटवतो.


गुजरात जरी साखळीतील दोन्ही सामने जिंकले असेल तरीही आज मुंबई 'करो या मरो' या निर्धारानेच खेळणार आहे. त्यामुळे गुजरातला जिंकणं तेवढे सोपे नाही. आण खरा सामना रंगणार आहे साई सुदर्शन विरुद्ध ट्रेंट बोल्ट, शुभमन गिल विरुद्ध प्रजापरप्रीत बुमराह, सूर्यकुमार विरुद्ध प्रसिध कृष्णा आणि रोहित विरुद्ध सिराज. चला तर जाणून घेऊयात महाराजा यादविंद्र सिंग मैदानावर कोणता संप ठरणार बाजीगर !

Comments
Add Comment

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत

U19 Asia Cup Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रेसह प्रशिक्षकांवरही कारवाई होणार; पाकविरुद्ध फायनलमध्ये दारुण पराभव होताच BCCI अ‍ॅक्शन मोडवर!

मुंबई : पाकिस्तानविरुद्ध अंडर-१९ आशिया कपच्या अंतिम सामन्यात झालेल्या दारुण पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक