
३५.३२ मीटर रुंद व ५० मीटर रुंद स्लॅब कास्टिंग सुरू
मुंबई : अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील विरार स्थानकाच्या पायाभरणीचे काम सुरू झाले आहे. पहिल्या स्लॅबचे कास्टिंग सुरु झाले असून तो ३५.३२ मीटर लांब आणि ५० मीटर रुंद आहे. या कामासाठी १५५५ घन मीटर काँक्रीट वापरण्यात येणार आहे. महाराष्ट्र-गुजरातदरम्यान ५०८ किमी लांबीच्या या प्रकल्पाचे काम गुजरातसह महाराष्ट्रातही वेगाने सुरू आहे. बीकेसी स्थानकानंतर विरार हे दुसरे स्थानक आहे. ठाणे, पालघर आणि मुंबई या जिल्ह्यांतून बुलेट ट्रेन धावणार असून हा प्रकल्प दोन राज्यांमधील महत्त्वाचा आर्थिक दुवा ठरणार आहे. या प्रकल्पाचे राज्यातील काम गुजरातपेक्षा उशिराने सुरू झाले असले तरी त्याने आता वेग पकडला असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यातील पहिल्या बीकेसी स्थानकाचे काम आधीच सुरू झाले आहे. महामुंबईतील ३ जिल्ह्यांमधून ही बुलेट ट्रेन धावणार असल्याने तो दोन राज्यांमधील महत्त्वाचा इकॉनॉमिक कॉरिडॉर ठरणार आहे.
मंत्री नितेश राणेंनी घेतली वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांची झाडाझडती
कुडाळ प्रतिनिधी : मंत्री नितेश राणेंनी कुडाळच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षाला भेट दिली तसेच वीज वितरण कंपनीच्या ...