
बॅरिकेट्ससह रस्तेही वाहतुकीस खुले करणार
मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व नियोजनानुसार, खोदकाम केलेल्या एकूण १३८५ रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. येत्या २ जून २०२५ पर्यंत काँक्रिट क्यूरिंग पूर्ण होत असून ५ जून २०२५ पर्यंत रस्त्यावरील सर्व रस्तारोधक अर्थात बॅरेकेट्स हटविले जातील आणि रस्ते वाहतुकीस खुले केले जाणार आहेत. ‘पीक्यूसी’ची कामे पूर्ण झाल्यामुळे आता रस्ते बांधणीतील अखेरची कामे (फिनिशिंग वर्क) प्रगतिपथावर आहेत. पावसाची उघडीप मिळताच रस्ते बांधणीतील थर्मोप्लास्ट, कॅट आईज, दिशादर्शक फलक, वाहतूक सुरक्षा चिन्हे, जंक्शन ग्रीड आदी कामे ५ जून २०२५ पर्यंत पूर्ण केली जाणार आहेत. रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्प अंतर्गत, टप्पा एक आणि टप्पा दोन मिळून एकूण १३८५ रस्ते कामे हाती घेण्यात आली आहेत. या सर्व रस्त्यांवर पेव्हमेंट क्वॉलिटी काँक्रिट (पीक्यूसी अर्थात (काँक्रिट ओतणे) रस्ते कामे पूर्ण झाली आहेत. पैकी, ३० रस्त्यांचा अंशतः भाग मास्टिक अस्फाल्टद्वारे पूर्ण करण्यात येत आहे. बहुतांशी रस्ते ‘एण्ड टू एण्ड’ तर काही रस्ते ‘जंक्शन टू जंक्शन’ पूर्ण झाले आहेत. उर्वरित कामे पावसाळ्यानंतर घेतली जाणार आहेत. अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी या रस्ते काँक्रिट कामांचा गुरुवारी २९ मे २०२५ रोजी महानगरपालिका मुख्यालयात आढावा घेतला.
परळच्या केईएम रुग्णालयातही पावसाचे पाणी
सुमोटो याचिकेत मुंबई महापालिकेला उच्च न्यायालयाकडून नोटीस मुंबई : सोमवारी मुंबईत झालेल्या जोरदार पावसात अनेक सखल भागांत मोठ्या प्रमाणात पाणी साचले. ...