Saturday, October 25, 2025
Happy Diwali

सीबीएसई पुरवणी परीक्षेसाठी आजपासून अर्ज

सीबीएसई पुरवणी परीक्षेसाठी आजपासून अर्ज

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना ३० मे ते १७ जून पर्यंत नियमित शुल्कासह अर्ज करता येतील. विलंब शुल्कासह १८ ते १९ जून दरम्यान अर्ज करता येतील. विद्यार्थी ३० मे पासून अधिकृत वेबसाइट cbse.gov.in ला भेट देऊन कंपार्टमेंट किंवा सुधारणा परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. नियमित विद्यार्थ्यांना संबंधित शाळांमधून अर्ज करावे लागतील.

१० वी आणि १२वी दोन्हीसाठी पुरवणी परीक्षा १५ जुलैपासून घेतल्या जातील. विलंब शुल्कासह अर्ज केल्यानंतर शाळांकडून अर्ज किंवा विद्यार्थ्यांची यादी सादर करण्यासाठी कोणतीही मुदतवाढ देणार नाही. शाळांना कंपार्टमेंट श्रेणीत ठेवलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एलओसी सादर करावा लागेल.

तसे झाले नाही तर संबधित विद्यार्थ्यांना कंपार्टमेंट परीक्षेत बसण्याची संधी मिळणार नाही. बोर्डाशी संलग्न शाळांमधून २०२५ च्या दहावी परीक्षेत बसणारे आणि ‘कंपार्टमेंट म्हणजेच अनुत्तीर्ण घोषित केलेले नियमित विद्यार्थी एक किंवा दोन कंपार्टमेंट विषयांमध्ये अर्ज करण्यास पात्र आहेत.

यावर्षी बोर्डाशी संलग्न शाळांमधून ६ किंवा ७ विषयांसह दहावीची परीक्षा दिलेल्या आणि उत्तीर्ण घोषित झालेल्या नियमित विद्यार्थ्यांनी कामगिरी सुधारणा श्रेणी अंतर्गत त्या विषयांमध्ये त्यांची कामगिरी सुधारू शकतात. दहावी उत्तीर्ण झालेले नियमित विद्यार्थी कामगिरी सुधारणा श्रेणी अंतर्गत जास्तीत जास्त दोन विषयांसाठी बसू शकतील. अिधक माहितीसाठी वेबसाइट cbse.gov.in ला भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा