Dry Nuts : काजू-बदामापेक्षा 'या' एका पदार्थामध्ये आहे जास्त प्रोटीन, रोज असे १० ड्रायफ्रूट्स

  105

मुंबई : सुक्यामेव्याचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. त्यामुळे आरोग्यतज्ज्ञ सुकामेवा खाण्याचा सल्ला देतात. मात्र सुकामेवा मर्यादित प्रमाणात खावा लागतो. सुक्यामेव्याचे अतिरेकी सेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. जर तुम्हाला तंदुरुस्त आणि निरोगी राहायचे असेल, तर तुम्ही तुमच्या आहारात काही आरोग्यदायी सुक्यामेव्याचा समावेश केला पाहिजे. तुमच्या आरोग्याच्या आधारावर तुम्ही कोणत्या सुक्यामेव्याचे सेवन केले पाहिजे हे जाणून घेऊ…



जाणून घ्या रोज खावे असे १० ड्रायफ्रूट्स


१. बदाम - जर तुम्हाला तुमच्या त्वचेचे आरोग्य सुधारायचे असेल, तर बदाम खा. कारण- त्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई असते. दररोज किमान ७ ते ११ बदाम खाण्याचा प्रयत्न करा. त्यांना रात्रभर भिजवल्याने पोषक घटकांच्या शोषणात अडथळा आणणारे कोणतेही फायटोकेमिकल्स निघून जातात.



२. ब्राझील नट्स - थायरॉईड ग्रंथीचे आरोग्य सांभाळण्यासाठी सेलेनियमने समृद्ध असलेले पदार्थ खा; जसे की ब्राझील नट्स. थायरॉईडच्या योग्य कार्यासाठी तज्ज्ञ दररोज किमान दोन ब्राझील नट्स खाण्याची शिफारस करतात.


३. काजू - काजू हाडांच्या आरोग्यास मदत करतात. कारण- ते मॅग्नेशियमचा चांगला स्रोत प्रदान करतात, ज्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारण्यासही मदत होते.


४. पिस्ता- जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करीत असाल, तर पिस्ता खा. पिस्ता खाण्याने शरीराला व्हिटॅमिन बी६ मिळते. पिस्ता हा एक उत्तम आरोग्यदायी नाश्ता आहे, विशेषतः संध्याकाळी.


५. शेंगदाणे- स्नायू मजबूत होण्यासाठी शेंगदाण्यांमधून प्रथिने मिळवा. नियमितपणे सेवन करण्यापूर्वी तुम्हाला शेंगदाण्यांची अॅलर्जी नाही याचीही खात्री करून घ्या.


६. अक्रोड- अक्रोड मेंदूच्या आरोग्यासाठी उत्कृष्ट आहेत. त्यात ओमेगा-3 फॅटी अॅसिड आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे मेंदूची जळजळ कमी करण्यास मदत करू शकतात.


७. हेझलनट्स - ऑक्सिडेटिव्ह ताण आणि पेशींच्या नुकसानीचा सामना करण्यासाठी, हेझलनट्स खा. ते अँटीऑक्सिडंट्सने भरलेले असतात, जे शरीराचे संरक्षण करण्यास मदत करतात. त्यात क जीवनसत्त्वसुद्धा असते, ज्यामुळे प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. हे जीवनसत्त्व शरीरातील संक्रमण आणि इतर रोगांचा बचाव करण्यास मदत करते. त्यात ई जीवनसत्त्व असते, जे एक शक्तिशाली अॅंटीऑक्सिडंट आहे. त्यामुळे कॅन्सरच्या पेशींचा विकास रोखता येतो.


८. पेकान - हे नट्स अक्रोडसारखे दिसतात. जर तुम्हाला कोलेस्ट्रॉलचा मोठ्या प्रमाणात त्रास होत असेल, तर पेकान नट्स तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात. ते मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्सचा चांगला स्रोत आहेत, जे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात.


९. मॅकाडामिया नट्स - मॅकडामिया नट्स त्यांच्या निरोगी चरबीमुळे हृदयाच्या आरोग्यास प्रोत्साहन देते, जे शरीरातील जळजळ कमी करण्यासदेखील मदत करतात.


१०. पाइन नट्स - तुमची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी पाइन नट्स खा. ते पोषक घटकांनी व खनिजांनी समृद्ध असतात, जे ऊर्जा प्रदान करतात आणि त्वचेचे आरोग्य सुधारतात.

Comments
Add Comment

Mohammad Shami: कोलकाता उच्च न्यायालयाकडून मोहम्मद शमीला मोठा झटका

नवी दिल्ली: कोलकाता उच्च न्यायालयाकडून क्रिकेटर मोहम्मद शमीला मोठा झटका बसला आहे. उच्च न्यायालयाने शमीला त्याची

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

टाकीचा स्लॅब कोसळून चिमुकल्यांच्या मृत्यू प्रकरणी दोन अधिकाऱ्यांचे निलंबन

आमदार निकोलेंच्या प्रश्नावर पाणीपुरवठा मंत्र्यांची कारवाई पालघर : डहाणू तालुक्यातील गट ग्रामपंचायत चळणी

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगात तीन नवीन सदस्यांची नियुक्ती

राजीव निवतकर व महेंद्र वारभुवन यांचा शपथविधी मुंबई : राज्य शासनाकडून महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगावर