भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदी टी दिलीप यांची नियुक्ती

संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर जाणार


नवी दिल्ली: योग्य पर्याय न मिळाल्याने बीसीसीआयने आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी टी दिलीप यांची राष्ट्रीय संघाच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदी पुन्हा नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.


गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या भारताच्या खराब कामगिरीनंतर प्रशिक्षक स्टाफमध्ये बदल झाल्यानंतर दिलीप यांना काढून टाकण्यात आले होते. यानंतर, दिलीप यांचे काम सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डेस्केट पाहायचे. सुरुवातीला त्यांची जागा घेतील अशी अपेक्षा असलेले रायन टेनडेस्केट सहाय्यक प्रशिक्षक म्हणून कायम राहणार आहेत. दिलीप हे एक चांगले प्रशिक्षक आहेत. त्यांनी तीन वर्षांहून अधिक काळ (२०२१ पासून) संघासाठी चांगले काम केले आहे. ते यातील बहुतेक क्रिकेटपटूंना खूप जवळून ओळखतात म्हणून त्यांना मोठ्या मालिकेसाठी संघात समाविष्ट करणे चांगले होईल, अशी बीसीसीआयला आशा आहे. त्यामुळेच त्यांना पुन्हा संघात समाविष्ट करण्यात आल्याचे समजते आहे.


दरम्यान, २०२१ मध्ये टी दिलीप यांची भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी आर श्रीधर यांची जागा घेतली. २०२४ च्या टी-२० विश्वचषकानंतर त्यांचा कार्यकाळ संपला. त्यानंतर त्यांचा करार मार्च २०२५ पर्यंत वाढवण्यात आला; परंतु त्यांना मध्येच काढून टाकण्यात आले. पण बीसीसीआयला अजूनही त्यांचा पर्याय सापडलेला नाही. त्यामुळे आता त्यांना पुन्हा ही जबाबदारी देण्यात आली आहे. दिलीप यांनी २००७ ते २०१९ पर्यंत हैदराबाद क्रिकेट असोसिएशनसोबत कोचिंग करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये कोचिंग केले.

Comments
Add Comment

ISPL 2025 : ISPL चं ऐतिहासिक पाऊल : टेनिस-बॉल क्रिकेटसाठी राष्ट्रीय स्पर्धात्मक आराखडा आणि झोनल पॅनल रचना लागू

मुंबई : भारतातील टेनिस-बॉल क्रिकेटला व्यावसायिक रूप देणाऱ्या इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग (ISPL) ने मोठा निर्णय

संघाला तारणाऱ्या ऋतुराज गायकवाडचे द्विशतक थोडक्यात हुकले

श्रेयस अय्यर २५ तर, जैस्वाल अवघ्या चार धावांवर बाद मुंबई : दुलीप ट्रॉफी २०२५-२६ स्पर्धा सध्या सुरू असून

आयपीएल अध्यक्षपदासाठी संजय नाईक आणि राजीव शुक्ला यांच्यात चुरस!

मुंबई (प्रतिनिधी) : बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा या महिन्याच्या अखेरीस होत आहे. बीसीसीआय आणि आयपीएल

आशिया कपमध्ये कोण असणार भारताचा स्पॉन्सरर ?

मुंबई : आशिया कप स्पर्धेपूर्वी संसदेत एक बिल पास झाले आणि बीसीसीआयच्या जर्सी स्पॉन्सरला गाशा गुंडाळावा लागला.

आर. प्रज्ञानंद फिडे क्लासिकल बुद्धिबळ क्रमवारीत चौथ्या स्थानी

मुंबई  : सिंकफिल्ड बुद्धिबळ करंडकात दुसरे स्थान मिळवलेल्या भारताच्या आर. प्रज्ञानंद याने फिडे क्लासिकल

रोहित शर्माने घटविले तब्बल २० किलो वजन

मुंबई : रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय टी२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून, वनडे क्रिकेटमध्ये सक्रिय