Friday, October 24, 2025
Happy Diwali

मीरा रोड येथील कामगारांच्या झोपड्यांना भीषण आग!

मीरा रोड येथील कामगारांच्या झोपड्यांना भीषण आग!

मीरा रोड : मीरा रोड येथील शीतल नगर भागात बांधकाम कामगारांना रहाण्यासाठी एका मोकळ्या प्लॉटमध्ये उभारण्यात आलेल्या झोपड्यांना गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास प्रचंड आग लागली. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

मीरा रोडच्या शीतल नगर भागात एका खाजगी विकासकाच्या बांधकामासाठी त्याच्या मोकळ्या प्लॉटमध्ये कामगारांना रहाण्यासाठी झोपड्या उभारण्यात आल्या होत्या. साधारण १०० मजूर तेथे राहत होते. दुपारी आग लागली तेव्हा अनेक जण कामावर होते तसेच काही गावाला गेले होते.

आगीचे कारण समजू शकले नाही, आग लागल्यानंतर दोन झोपड्यातील गॅस सिलेंडर फुटल्यामुळे मोठा धमाका झाला तसेच आगीने रौद्र रूप धारण केले. त्यामुळे परिसरात घबराट पसरली. मीरा भाईंदर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले.

Comments
Add Comment