मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी वर्षा बंगल्याबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न झाला. या प्रकरणात अंगावर पेट्रोल टाकून घेत असलेल्या अजित रामकृष्ण मैंदरगी या ३९ वर्षाच्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. अजित हा सोलापूर जिल्ह्यातील बलिवेसचा निवासी आहे. पोलिसांनी अजित विरोधात गुन्हा नोंदवला नंतर त्याला कायदेशीर नोटीस देऊन सोडण्यात आले.
अजित वर्षा बंगल्यात घुसखोरीचा प्रयत्न करत होता. पोलिसांनी त्याला अडवले, त्यावेळी अजितने खिशातून बाटली काढून अंगावर पेट्रोल ओतून घेतले पण पोलिसांनी त्याला लगेच पकडले. यानंतर त्याची अंगझडती घेण्यात आली. पकडल्यानंतर पोलिसांनी अजितची कसून चौकशी केली. यानंतर पोलिसांनी कायदेशीर नोटीस देऊन अजितला सोडून दिले. अजित प्रकरणात तपास सुरू आहे. अजितच्या कृत्यामागील नेमका हेतू जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.