करण जोहर यांनी केली त्याच्या आगामी सिनेमाची घोषणा!

मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते करण जोहर विविध कारणांमुळे चर्चेत असतात. लवकरच ते एका नवीन चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहेत. या चित्रपटाचे नाव 'लग जा गले' असे असून, राज मेहता दिग्दर्शित आणि करण जोहर निर्मित असलेल्या या आगामी प्रोजेक्टमध्ये जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत असल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर पहिल्यांदाच एक हँडसम हंक अभिनेता जान्हवीसोबत मुख्य भूमिकेत चित्रपटामध्ये रोमान्स करताना दिसणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.


राज मेहता दिग्दर्शित हा चित्रपट रोमान्स आणि अ‍ॅक्शन सीन्सने भरलेला असणार आहे. २०१८ मध्ये करण जोहरच्या 'धडक' चित्रपटातून आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात करणारी अभिनेत्री जान्हवी कपूर या चित्रपटात मुख्य स्रीपात्राच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. तसेच माहितीनुसार, जान्हवीसोबत अभिनेता टायगर श्रॉफ 'लग जा गले' चित्रपटात स्क्रीन शेअर करणार आहे. तसेच, दोघेही पहिल्यांदाच या चित्रपटात काम करणार आल्याचे सांगितले जात आहे. माहितीनुसार ह्या चित्रपटामध्ये एक सूड घेणारी प्रेमकथा असेल.


मिळालेल्या माहितीनुसार, सध्या अभिनेता टायगर श्रॉफ हा 'बॅगी ४' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे तर जान्हवी कपूर ही 'सनी संस्कार की तुलसी' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याचे सांगण्यात येत आहे.

Comments
Add Comment

‘एकाकी’मधील जॉनर बदलासाठी आशिष चंचलानीचे एस.एस. राजामौलींने केले कौतुक

आशिष चंचलानी, जे भारतातील सर्वात मोठ्या डिजिटल स्टार्सपैकी एक आहेत आणि ज्यांची देशभरात जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे,

साऊथचे सुपरस्टार 'रजनीकांत' चे काय आहे खरे नाव ?

रजनीकांत म्हणून ओळखले जाणारे दाक्षिणात्य तसेच हिंदी चित्रपटांमद्धे नावाजलेले असे ,'थलायवा' अर्थात रजनीकांत

यंग आर्टिस्ट स्कॉलरशीप

करिअर : सुरेश वांदिले यंग आर्टिस्ट स्कॉलरशीप या शिष्यवृत्तीचा कालावधी दोन वर्षांचा आहे. या कालावधीत संबंधित

व्ही. शांताराम चित्रपटातील जयश्रीच्या भूमिकेत तमन्ना भाटिया

भारतीय सिनेमातील महान दिग्दर्शक आणि निर्माता शांताराम राजाराम वणकुद्रे (व्ही. शांताराम) यांच्या जीवनावर आधारित

हेमंत ढोमे यांच्या शाळेत ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’चा संगीत अनावरण सोहळा

रत्नाकर मतकरींचं ‘स्वर्गात आकाशगंगा’ नव्या अंदाजात ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ चित्रपटातील

हृषिकेश जोशींच्या ‘बोलविता धनी’ नाटकासाठी क्षितीश दाते सज्ज!

प्रसिद्ध अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक हृषिकेश जोशी यांच्या आगामी 'बोलविता धनी' या नाटकाची सध्या नाट्यवर्तुळात