Bharat Forecast System : भारत सांगणार जगातील सर्वात अचूक हवामान अंदाज!

अमेरिका, यूकेपेक्षाही भारत एक पाऊल पुढे


भारताने हवामान अंदाजाच्या क्षेत्रात एक नवा विक्रम केला आहे. भारत अंदाज प्रणाली अर्थात BFS नावाची ही अत्याधुनिक प्रणाली ६ किलोमीटर रिझोल्युशनसह जगातील सर्वात अचूक हवामान अंदाज देणार आहे. सुपरकॉम्प्युटर 'अर्का'वर चालणारी ही प्रणाली भारताला हवामान अंदाजात अमेरिका, यूके आणि युरोपियन युनियनपेक्षा एक पाऊल पुढे घेऊन गेलीय. चला, जाणून घेऊया या क्रांतिकारी प्रणालीबद्दल आणि तिच्या फायद्यांबद्दल.



भारत अंदाज प्रणालीची अचुकता



भारत अंदाज प्रणाली म्हणजेच BFS ही प्रणाली पुण्यातील IITM संस्थेनं विकसित केलीय. ही प्रणाली ६ किमी बाय ६ किमी रिझोल्युशनसह हवामानाचा अंदाज देते. या भारत अंदाज प्रणालीची अचुकता ही पूर्वीच्या १२ किमी ग्रिड मॉडेलपेक्षा दुप्पट आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक गावासाठी हवामानाचा अचूक अंदाज मिळू शकणार आहे. ही प्रणाली सुपरकॉम्प्युटर 'अर्का'वर चालते. ज्याची गणना गती ११.७७ पेटाफ्लॉप्स आणि साठवण क्षमता ३३ पेटाबाइट्स आहे. त्यामुळे हवामान अंदाजाचा वेळ १० तासांवरून ४ तासांपर्यंत कमी झालाय आणि हेच भारताचं मोठं यशही आहे. २६ मे २०२५ रोजी केंद्रीय पृथ्वी विज्ञानमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी भारत अंदाज प्रणालीचं उद्घाटन केलं. ही पूर्णपणे स्वदेशी प्रणाली 'मेक इन इंडिया' उपक्रमाचा भाग आहे. ही प्रणाली उष्णकटिबंधीय प्रदेशांमधील हवामानाचा अचूक अंदाज देते. त्यामुळे मुसळधार पाऊस, उष्णतेच्या लाटा किंवा चक्रीवादळ यांचा अचूक अंदाज वर्तवता येणं शक्य झालंय. या स्वदेशी प्रणालीमुळे भारताची जागतिक स्तरावर शान वाढलीय. या प्रणालीमुळे शेतकरी, स्थानिक प्रशासन आणि उद्योगांना मोठा फायदा होईल, असं डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटलंय.




प्रणालीचं नेतृत्व चार महिला शास्त्रज्ञांकडे 


भारत अंदाज प्रणालीचं मोठं वैशिष्ट्य म्हणजे तिची स्थानिक पातळीवरील अचूकता. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांचे नियोजन, पेरणी आणि कापणीच्या वेळांसाठी अचूक माहिती उपलब्ध होणार आहे. तसंच शेतकऱ्यांचं होणारं मोठं नुकसान टाळता येणार आहे. अर्थात या प्रणालीचा शेतीला फायदा होणार असल्याने अन्नधान्याच्या किमतीही स्थिर राहण्यास मदत होईल. स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यांनाही वेळेवर सूचना मिळू शकत असल्याने ही प्रणाली फायदेशीर ठरणार आहे. दुसरीकडे भारत अंदाज प्रणालीचं नेतृत्व चार महिला शास्त्रज्ञांकडे आहे. हे नारी शक्तीचे प्रतीक आहे. त्यांनी जागतिक पातळीवर
९ ते 14 किमी रिझोल्युशन मॉडेल्सना मागे टाकत ६ किमी रिझोल्युशन प्रणाली विकसित केलीय. त्यामुळे आता भारत हवामान अंदाजात जागतिक पातळीवर आघाडीवर आहे आणि देशासाठी ही बाब अभिमानास्पद आहे.



बीएफएस हे शेतकऱ्यांचे सक्षमीकरण


भारत अंदाज प्रणाली म्हणजे बीएफएस हे केवळ वैज्ञानिक यशच नाही, तर शेतकऱ्यांचे सक्षमीकरण आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी मोठं योगदान ठरणार आहे. देशासाठी उपयुक्त प्रणाली ठरणार आहे. ४० डॉपलर रडार आणि भविष्यात १०० रडारच्या योजनेद्वारे भारत अंदाज प्रणाली प्रत्येक गावाला रिअल-टाइम हवामानाच्या अंदाजाचा अलर्ट देईल. भारताची ही कामगिरी भारताला जागतिक अर्थव्यवस्था बनण्याच्या स्वप्नाला बळ देणारी आहे. एकूणच भारत अंदाज प्रणाली विकसित करून भारताने क्रांती केलीय. या क्रांतीची दखल जगाला घ्यावी लागणार आहे.

Comments
Add Comment

हिंदूंना एकत्र करून हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी पदयात्रा: धीरेंद्र शास्त्री

आग्रा (उत्तर प्रदेश) : आध्यात्मिक नेते धीरेंद्र शास्त्री यांनी आज सांगितले की, हिंदूंना एकत्र करण्यासाठी, हिंदू

बिहारनंतर आता देशभरात लागू होणार 'SIR': निवडणूक आयोगाची दिल्लीत महत्त्वाची बैठक

नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये चर्चेत आलेल्या एसआयआर (Systematic Integrity Review) प्रणालीचा आता संपूर्ण देशभरात एकाच

भारताच्या विरोधात कट? अमेरिकेचे लष्करी विमान थेट पाकिस्तानमध्ये उतरल्याने खळबळ

नवी दिल्ली: भारत आणि अमेरिकेतील संबंध तणावपूर्ण असतानाच, अमेरिकन हवाई दलाचे एक मोठे लष्करी विमान थेट

प्रयागराजमध्ये गंगा नदीत तीन किशोरवयीन मुले बुडाली

प्रयागराज : प्रयागराज जिल्ह्यातील पुरामुफ्ती परिसरात आज गंगेत आंघोळीसाठी गेलेली तीन किशोरवयीन मुले बुडाली, असे

अयोध्येतील राम मंदिर उद्या दुपारनंतर राहणार बंद

अयोध्या : रविवारी चंद्रग्रहणामुळे रामनगरी अयोध्येतील रामललांचे दर्शन दुपारनंतर घेता येणार नाही. ग्रहणाचे वेध

आई-वडील, सासू-सास-यांसोबत वेळ घालवण्यासाठी मिळणार रजा!

गुवाहाटी: पालकांसोबत आणि सासरच्यांसोबत वेळ घालवण्यासाठी आसाम सरकारने नोव्हेंबर महिन्यात कर्मचाऱ्यांना २