
नवी दिल्ली : जेव्हा चंद्र हा सूर्य व पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा पृथ्वीवर चंद्राची सावली पडते. या सावलीतून दिसणाऱ्या स्थितीला सूर्यग्रहण म्हणतात. यंदाच्या वर्षात म्हणजेच २०२५ मध्ये ही स्थिती अर्थात सूर्यग्रहण २१ सप्टेंबर रोजी आहे. ज्योतिषशास्त्र आणि खगोलशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या ग्रहणांबाबत अनेकांना उत्सुकता असते. याआधी २९ मार्च रोजी सूर्यग्रहण झाले होते. ते आंशिक सूर्यग्रहण होते. हे ग्रहण भारतातून दिसले नव्हते. आता २१ सप्टेंबर रोजी दिसणार असलेले सूर्यग्रहणही आंशिक आहे आणि भारतातून दिसणार नाही.
केव्हा आहे वर्षातील दुसरे सूर्यग्रहण ?
यंदाच्या वर्षातील दुसरे सूर्यग्रहण २१ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री १० वाजून ५९ मिनिटांनी सुरू होईल आणि रात्री उशिरा ०३ वाजून २३ मिनिटांनी (२२ सप्टेंबर २०२५) संपेल. हे एक आंशिक सूर्यग्रहण असेल, जे अश्विन अमावस्येला होणार आहे.
सूर्यग्रहण कुठे दिसणार ?
हे सूर्यग्रहण प्रामुख्याने न्यूझीलंड, फिजी, अंटार्क्टिका आणि ऑस्ट्रेलियाच्या अनेक भागांमध्ये दिसणार आहे. मात्र, हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे भारतात याचे धार्मिक किंवा ज्योतिषीय परिणाम विचारात घेतले जाणार नाहीत आणि सुतक काळही लागू होणार नाही.
२०२५ मधील पहिले सूर्यग्रहण कधी झाले ?
यापूर्वी २०२५ मधील पहिले सूर्यग्रहण २९ मार्च रोजी झाले होते. ते देखील आंशिक सूर्यग्रहण होते आणि ते भारतात दिसले नव्हते.
सूर्यग्रहण ही एक खगोलीय घटना आहे, जिथे चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो, ज्यामुळे सूर्याचा प्रकाश काही प्रमाणात किंवा पूर्णपणे पृथ्वीवर पोहोचू शकत नाही. धार्मिक आणि ज्योतिषीयदृष्ट्या ग्रहणाचे विशेष महत्त्व मानले जाते, परंतु ते दिसणाऱ्या प्रदेशांसाठीच लागू होते. जे ग्रहण काळतात सूतक पाळतात अशा भारतीयांनी यंदाच्या सूर्यग्रहणावेळी सूक पाळण्याची आवश्यकता नाही. कारण हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही.