
हवामान विभागाच्या अंदाजानुसार जून २०२५ मध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. यंदा जून महिन्यात पावसाचं प्रमाण दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत १०८ टक्के जास्त असेल. यामुळे यंदा जून महिन्यात मागील सोळा वर्षांचे पावसाचे रेकॉर्ड मोडीत निघतील, जास्त पाऊस पडेल. हवामान विभागाच्या अंदाजानुसार जून महिन्यात वायव्य भारतात पावसाचे प्रमाण सामान्यपेक्षा जास्त असेल. मध्य आणि दक्षिण भारतामध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे.
ऐन मे महिन्यात मान्सून महाराष्ट्रात आला असला तरी २८ किंवा २९ मे पासून ५ जून पर्यंत पाऊस पडणार नाही. यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
महाराष्ट्रात मागील चार दिवसांत मुसळधार पावसामुळे २१ जणांचा मृत्यू झाला असून १२ जण जखमी झाले आहेत. मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. ठिकठिकाणी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन नियमानुसार भरपाई देण्याचे आश्वासन राज्य शासनाने दिले आहे.