Digital Detox : डिजिटल डिटॉक्स म्हणजे नक्की काय ? आरोग्यावर होणारे फायदे जाणून घ्या

  61

मुंबई : आजच्या डिजिटल युगात इंटरनेट फारच महत्वाचं आहे. इंटरनेट हा आपल्या आयुष्याचा एक भाग झाला आहे. आपण अगदी छोट्या गोष्टी करण्यासाठीसुद्धा फोन शोधत असतो. फोनपासून आपण क्षणभरही दूर राहू शकत नाही. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण आपल्या मोबाईलमध्ये व्यस्त असतो. पण तुम्हाला माहिती आहे का या सवयीचा तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम करतात, अशा परिस्थितीत आजकाल एकच शब्द खूप ट्रेंड होत आहे डिजिटल डिटॉक्स. हे डिजिटल डिटॉक्स तुमच्या जीवनशैलीचा भाग बनवून, तुमचे आरोग्य नैसर्गिकरित्या चांगले ठेऊ शकता.



डिजिटल डिटॉक्समध्ये थोड्या वेळासाठी तुमचा फोन आणि लॅपटॉपचा वापर न केल्यास तुमचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य निरोगी राहते. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणे फक्त एका निश्चित वेळी वापरा जेणेकरून त्याचा तुमच्या आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही.



‘डिजिटल डिटॉक्स’ म्हणजे काय?


डिजिटल डिटॉक्सचा अर्थ असा नाही की तुम्ही फोन वापरणे थांबवावे. कारण फोनशिवाय तुमची बरीच कामे थांबतील. याचा अर्थ असा की तुम्ही दिवसाच्या 24 तासांत काही काळ फोन, लॅपटॉप किंवा टॅबलेट वापरू नये. तुम्ही तुमचा फोन किंवा लॅपटॉप फक्त गरज असेल तेव्हाच वापरावा आणि काही वेळेसाठी तुमचे इलेक्ट्रॉनिक उपकरण बंद करा आणि काही वेळ एकटे किंवा कुटुंब किंवा मित्रांसोबत घालवावा. असे केल्याने तुमचे मानसिक आरोग्य चांगले राहते आणि तुमचा मेंदूही अधिक तीक्ष्ण काम करतो.



‘डिजिटल डिटॉक्स’ चे काय फायदे आहेत?


१) मानसिक आरोग्य निरोगी ठेवते


चांगल्या मानसिक आरोग्यासाठी गाढ झोप आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही दिवसभर इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरत राहता तेव्हा त्याचा पहिला परिणाम तुमच्या झोपेवर होतो. तुम्हाला झोप येत नाही, ज्यामुळे नंतर नैराश्य आणि चिंता यासारखे अनेक आजार होतात. अशा परिस्थितीत झोपण्यापूर्वी फोन, लॅपटॉप आणि टीव्हीपासून अंतर ठेवण्याचा प्रयत्न करावा. यामुळे तुम्हाला चांगली झोप येण्यास मदत होते.


२) शरीराला ऊर्जा मिळते


आजच्या युगात आपण तंत्रज्ञानावर इतके अवलंबून झालो आहोत की आपण आपले खरे सामाजिक जीवन विसरत चाललो आहोत. कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवत असतानाही आपण फोनवर व्यस्त असतो. अशावेळेस जर तुम्ही डिजिटल डिटॉक्सचा अवलंब केला तर ते तुमच्या शरीरात ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करते. तुम्ही मित्र आणि कुटुंबासोबतही वेळ घालवता.


३) लक्ष केंद्रित करते


मोबाईलचे व्यसन सर्वांसाठी हानिकारक आहे. अशा परिस्थितीत डिजिटल डिटॉक्सचे पालन केल्याने तुमची मोबाईल वापरण्याची सवय कमी होते. जर स्क्रीन टाइम कमी असेल तर तुम्ही इतर महत्त्वाच्या कामांवर लक्ष केंद्रित करू शकता.


४) स्मरणशक्ती तीव्र होते


जेव्हा तुम्ही दिवसभर फोन, लॅपटॉप किंवा टीव्ही सारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरत नाही. जर तुम्ही तुमचा फोन आणि लॅपटॉप थोड्या काळासाठी वापरलात तर ते तुमचे मन मजबूत करते आणि तुम्ही जास्त काळ गोष्टी लक्षात ठेवू शकता.


५) स्वतःसाठी वेळ काढा


डिजिटल डिटॉक्सच्या मदतीने तुम्ही स्वतःसाठीही वेळ काढू शकता. जेव्हा तुम्ही स्वतःसोबत एकटे वेळ घालवता तेव्हा तुम्ही तुमच्या कमतरतांकडे अधिक लक्ष देऊ शकता आणि स्वतःला चांगले समजून घेऊ शकता.

Comments
Add Comment

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

टाकीचा स्लॅब कोसळून चिमुकल्यांच्या मृत्यू प्रकरणी दोन अधिकाऱ्यांचे निलंबन

आमदार निकोलेंच्या प्रश्नावर पाणीपुरवठा मंत्र्यांची कारवाई पालघर : डहाणू तालुक्यातील गट ग्रामपंचायत चळणी

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगात तीन नवीन सदस्यांची नियुक्ती

राजीव निवतकर व महेंद्र वारभुवन यांचा शपथविधी मुंबई : राज्य शासनाकडून महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगावर

नोकरीच्या शोधात आहात? तर ही बातमी आहे तुमच्यासाठी

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती, ८,७६७ पदांना मान्यता मुंबई : जलसंधारण विभागाला नव्याने ८,७६७