
पोस्टमॉर्टेम रिपोर्टनुसार ज्या दिवशी वैष्णवीने आत्महत्या केली त्या दिवशीही तिला बेदम मारहाण झाली होती. वैष्णवीच्या मृतदेहावार एकूण २९ जखमा आढळल्या. यातील १५ जखमा या मृत्यूआधीच्या २४ तासांतील असल्याचे पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये नमूद आहे. बावधन पोलिसांनी ही माहिती न्यायालयात दिली आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना वैष्णवी हगवणेचे वडील अनिल कस्पटे यांनी तपास विशेष तपास पथकामार्फत अर्थात स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमकडून (एसआयटी) करुन घ्यावा, अशी मागणी केली आहे.
शरीरारावरील जखमांबाबत पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये नमूद माहितीनुसार ज्या दिवशी वैष्णवीने आत्महत्या त्या दिवशी तिला बेदम मारहाण झाली होती. तसेच याआधीही वारंवार मारहाण होतच होती. कधी पाईप तर कधी गज वापरुन मारहाण करण्यात आली होती. वैष्णवीचा वारंवार शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. छळ करुन वैष्णवीची हत्या करण्यात आली. या प्रकरणात विशेष तपास पथकामार्फत अर्थात स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमकडून (एसआयटी) तपास करुन घेतला तर दोषींना शिक्षा होईल, अशी आशा वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी व्यक्त केली.