Thursday, May 29, 2025

ताज्या घडामोडीनाशिक

Savarkar Jayanti: भगूरला आज सावरकर जयंती उत्सव

Savarkar Jayanti: भगूरला आज सावरकर जयंती उत्सव

पूर्वसंध्येला सावरकर स्मारक विद्युत रोषणाईने उजळले


दे. कॅम्प: भगूर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४२ व्या जयंतीचे (Swatatryaweer Sawarkar Birth Aniversary) आयोजन बुधवारी (दि. २८) करण्यात आले आहे. सावरकर स्मारक विद्युत रोषणाईने उजळून निघाले आहे. सकाळी ८ वाजता पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक गोटे यांच्या हस्ते शासकीय पूजा पार पडणार आहे. त्यानंतर नाशिक येथील चारुदत्त दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली बागेश्री ग्रुप सावरकर गीतांचे सादरीकरण करणार आहे.


स्मारकात सावरकरांनी लिहिलेली तसेच त्यांच्यावर आधारित पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध असतील.सकाळी ८ वाजता स्वा. सावरकर जयंती उत्सव समितीच्या वतीने गायकवाड गल्लीपासून सावरकर ग्रंथ दिंडी व शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या शोभा यात्रेत प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम व शरद पोंक्षे, तसेच अनेक आमदार व खासदार सहभागी होणार आहेत.


सकाळी ९ वाजता अभिनव भारत पार्टीच्या वतीने चेतन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली स्वा. सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी रॅली काढण्यात येणार आहे. सावरकर जयंतीच्या निमित्ताने भगूर पुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूहाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे नेतृत्व मनोज कुवर, प्रशांत लोया, योगेश बुरके, मंगेश मरकड, व संभाजी देशमुख करत आहेत.

Comments
Add Comment