Thursday, May 29, 2025

ताज्या घडामोडीठाणे

आज डोंबिवलीत स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती उत्सव

आज डोंबिवलीत स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती उत्सव
डोंबिवली : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ डोंबिवली विभागातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. तसाच ह्यावर्षी देखील स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था, डोंबिवली शाखेतर्फे आज २८ मे २०२५ रोजी, सर्वेश हॉल, ताई पिंगळे चौक, डोंबिवली पूर्व येथे संध्याकाळी ५.३० ते ८.३० या वेळेत हा जयंती उत्सव जोशात साजरा होणार आहे.



या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक काळाराम मंदिर येथील महंत सुधीर दासजी उपस्थित राहणार असून अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरकर या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भुषवतील आणि स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी, अभ्यासक आणि प्रथितयश वक्ता, पार्थ बावस्कर प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. स्वातंत्रवीर सावरकर ह्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले जावे ह्या साठी सह्यांची मोहीम ही याठिकाणी राबवली जाणार आहे.
Comments
Add Comment