
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या शेवटच्या साखळी सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लखनऊ सुपर जायंट्सला ६ विकेटनी हरवत पॉईंट्सटेबलमध्ये टॉप २मध्ये स्थान मिळवले आहे. या सामन्यासह प्लेऑफची समीकरणे स्पष्ट झाली आहेत. प्लेऑफसाठी मुंबई, आरसीबी, गुजरात आणि आरसीबी या संघांनी क्वालिफाय केले आहे.
अशी आहे पॉईंट्सटेबलची स्थिती
पॉईंट्सटेबलमध्ये १९ गुणांसह पंजाब किंग्सचा संघ अव्वल स्थानावर आहे. तर आरसीबीचा संघ १९ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. पंजाबचा रनरेट चांगला असल्याने ते अव्वल आहे. तर गुजरात १८ गुणांसह तिसऱ्या आणि मुंबई १६ गुणांसह चौथ्या स्थानावर आहेत. आयपीएलमध्ये टॉप २मध्ये जागा मिळवणाऱ्या संघाला फायनलमध्ये खेळण्यासाठी २ संधी मिळतात.
प्लेऑफमध्ये कोण कोणाशी भिडणार
२९ मेला आयपीएलचा पहिला क्वालिफायर खेळवला जाईल. या दिवशी टेबलमधील टॉप २ संघ म्हणजेच पंजाब किंग्स आणि आरसीबी यांच्यात टक्कर होईल. हा सामना चंदीगडमध्ये होईल. जो संघ जिंकेल तो फायनलमध्ये पोहोचेल. मात्र हरणाऱ्या संघाला आणखी एक संधी मिळेल.
The playoffs battles are set! 🤩
Get ready for the final frontier 🙌#TATAIPL | #LSGvRCB pic.twitter.com/hW7ocjr871
— IndianPremierLeague (@IPL) May 27, 2025
तर ३० तारखेला तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावरील संघामध्ये सामना रंगेल. जो संघ पराभूत होईल त्यांचा प्रवास तेथेच संपेल. मात्र जिंकणाऱ्या संघाला क्वालिफायर १मध्ये पराभूत झालेल्या संघाविरुद्ध आणखी एक सामना खेळावा लागेल. हा सामना १ जूनला अहमदाबादमध्ये खेळवला जाईल. क्वालिफायर २मधील विजेता संघ ३ जूनला फायनल खेळेल.