
मुंबई : पावसाने बुधवारी दुपारी पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावल्याने मुंबई-ठाण्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. बुधवारी दुपारनंतर जोरदार पाऊस सुरू झाला आणि मुंबईत अनेक ठिकाणी गोंधळाची स्थिती निर्माण झाली.
मेट्रो स्टेशनवर गळती, बादल्या ठेऊन पाणी अडवण्याचा प्रयत्न!
मेट्रो ३ च्या वरळी स्थानकात तिकीट काउंटरजवळ छत गळायला लागलं. गळती थांबवण्यासाठी बादल्या ठेवल्या गेल्या आणि कर्मचाऱ्यांनी सतत पाणी फेकत परिस्थिती सावरली. याआधीही आचार्य अत्रे स्थानकावर अशीच गळती झाली होती. प्रवाशांनी संताप व्यक्त करत तातडीने दखल घेण्याची मागणी केली आहे.
उपनगरीय रेल्वे विस्कळीत, अंधेरी सबवे जलमय!
मध्य रेल्वे २०-२५ मिनिटे तर पश्चिम रेल्वे ५-१० मिनिटे उशिराने धावत आहे. अंधेरी सबवे मध्ये २-३ फूट पाणी साचल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

सोलापूर: करमाळा तालुक्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. सलग बारा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान (Rain Hits Crops) झाले आहे. तालुक्यातील ...
भिवंडीमध्ये पाणीच पाणी!
दुपारनंतर भिवंडीत जोरदार पावसाने हजेरी लावली. भाजी मार्केट आणि तीनबत्ती परिसरात २ फूटांपर्यंत पाणी साचलं, नागरिकांची एकच धावपळ उडाली आहे.
सिंधुदुर्गात रेड अलर्ट, एनडीआरएफ तैनात
तळकोकणात रेड अलर्ट जारी. सिंधुदुर्गात पूरस्थितीची शक्यता लक्षात घेता एनडीआरएफची तुकडी दाखल. अतिवृष्टीमुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत.