Thursday, May 29, 2025

देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

मणिपूरमध्ये पुन्हा स्थापन होणार रालोआचे सरकार ?

मणिपूरमध्ये पुन्हा स्थापन होणार रालोआचे सरकार ?

इंफाळ : राष्ट्रपती राजवट लागू असलेल्या मणिपूरमध्ये भाजपाच्या नेतृत्वाच रालोआचे पुन्हा एकदा सरकार स्थापन होण्याची चिन्हं आहेत. भाजप नेते थोकचोम राधेश्याम सिंह यांनी बुधवार २८ मे २०२५ रोजी राज्यपाल अजय कुमार भल्ला यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना थोकचोम राधेश्याम सिंह यांनी राज्यातले ४४ आमदार नवीन सरकार स्थापन करण्यास तयार आहेत, असे जाहीर केले. इतर नऊ आमदारांसह एकूण ४४ आमदारांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेस तयार असल्याचे सांगितले, अशी माहिती त्यांनी दिली.


केंद्रीय नेतृत्वाच्या मार्गदर्शनानुसार राज्यातले आमदार पुढील निर्णय घेतील, असे भाजप नेते थोकचोम राधेश्याम सिंह यांनी सांगितले. मणिपूरचे विधानसभाध्यक्ष सत्यव्रत यांनी ४४ आमदारांची एकत्र तसेच स्वतंत्रपणे भेट घेतली आणि त्यांकडून सत्तास्थापनेसाठी एकत्र आल्याची खात्री करुन घेतली.


मणिपूरमध्ये पुन्हा रालोआचे सरकार आले तर एन. बिरेन सिंह हेच मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. पण त्याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. मागच्या सरकारच्या काळात कोरोनामुळे दोन वर्षे वाया गेली आणि यंदाच्या सरकारमध्ये राजकीय संघर्षामुळे दोन वर्षे वाया गेली आहेत. कुकी आणि जोस या दोन प्रमुख जातींमधील संघर्षाला हाताळण्यात अपयशी ठरल्याचा ठपका आल्यानंतर एन. बिरेन सिंह यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. आता पुन्हा एकदा एन. बिरेन सिंह हेच मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. याआधी जातीय संघर्ष हाताळण्यात अपयशी ठरल्याचे कारण देत एन. बिरेन सिंह यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. आता त्यांच्याच गळ्यात नव्याने मुख्यमंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता आहे.


सध्या मणिपूरच्या ६० सदस्यांच्या विधानभेत ५९ सदस्य आहेत. एका आमदाराचा मृत्यू झाला आहे. भाजपाच्या नेतृत्वातील रालोआकडे ४४ आमदार आहेत. यात ३२ मैतेईंचे प्रतिनिधीत्व करणारे आमदार, तीन मणिपूरचे मुसलमान आमदार आणि इतर नऊ आमदार आहेत.


काँग्रेसकडे फक्त पाच मैतेई आमदार आहेत. या व्यतिरिक्त १० कुकी आमदार आहेत. यापैकी सात जणांनी भाजपाच्या तिकिटावर मागील निवडणुकीत विजय मिळवला होता, दोन कुकी पीपल्स अलायन्सचे आहेत आणि एक अपक्ष आहे.


मणिपूर विधानसभा एकूण सदस्य संख्या ६०
भाजपा आमदार ३२
एनपीपी आमदार ७
एनपीएफ आमदार ५
जेडीयू आमदार ६ (या सहा पैकी पाच जणांनी भाजपात प्रवेश केला आहे)
काँग्रेस आमदार ५
इतर आमदार ५


एका आमदाराच्या मृत्यूमुळे विधानसभेतील आमदार संख्या आता ५९* झाली आहे

Comments
Add Comment