
पावसाळ्यात तुम्ही अशा कपड्यांची निवड करायला हवी की, ज्या कपड्यांवर तुम्ही भिजलात तरी ते सहज कोरडे होतील. खरं तर पावसात फॅशन करणे थोडे कठीणच असते.. कारण कामानिमित्त जेव्हा बाहेर पडावे लागते, तेव्हा अचानक पाऊस आला आणि तुमच्याकडे छत्री नसेल तर कपडे भिजतात, डॅशिंग केलेली फॅशन पूर्ण बिघडते. काही महिलांना फिकट रंगाचे कपडे परिधान करायला खूप आवडतात. मात्र अशा फिकट रंगांच्या कपड्यांचा वापर पावसाळ्यात कमीच करायला हवा. मग पावसाळ्यात असे कोणते कपडे घालावे? एकदम भारी आऊटफिट परिधान करायचा आहे मग तो कसा करायचा? असे अनेक प्रश्न मुलींना किंवा महिलांना पडतात. पण चिंता करू नका, आज आम्ही तुम्हाला या लेखातून मान्सून फॅशन आऊटफिट्सचे असे काही पर्याय सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल राहाल, आणि एकदम स्टायलिशही दिसाल....
क्रॉप टॉप विथ हाय वेस्ट जिन्स
अगदी सुटसुटीत आणि आरामदायी असा क्रॉप टॉप आणि यावर हाय वेस्टची जिन्स एकदम कमाल वाटते. पावसाळ्यात तुम्ही ट्रिपला जात असाल तर हा आऊटफिट तुमच्यासाठी एकदम भारी आहे. चमकदार रंगाचे आणि फ्लोरल प्रिंट किंवा एम्ब्रॉयडरी असलेले क्रॉप टॉप तुम्ही हाय वेस्टेड स्कर्ट किंवा जिन्सवर स्टाईल करू शकता.
जंपसूट
बऱ्याच प्रसंगी घालण्यासाठी जंपसूट हा उत्तम पर्याय आहे. या प्रकारच्या आउटफिटमध्ये तुम्ही कम्फर्टेबल राहता, त्यामध्ये तुम्ही एकदम स्टायलिशही दिसता. तुमच्या जंपसूटला मॅच होईल अशी अॅक्सेसरीज घातली तर तुमचा लूक मस्त दिसेल. जंपसूटमध्ये वेगवेगळे पॅटर्न आणि डिझाइन्स तुम्हाला बाजारामध्ये पाहायला मिळतील.
हाय वेस्टेड प्लाझो विथ शर्ट
तुमच्या वॉर्डरोबमध्ये हाय वेस्टेड प्लाझो पँट्स असायलाचं हवी कारण ही प्लाझो अतिशय सुटसुटीत आणि आरामदायी असते. पावसाळ्यात तुमचा प्रवास वैतागवाना असेल तर ही प्लाझो तुम्ही व्हाईट शर्ट किंवा ब्लॅक शर्ट नक्की परिधान करू शकता. पावसाळ्यात तुमचा प्रवास आरामदायी होईल.
जंपसूट विथ जॅकेट
हा जंपसूट परिधान केला तर अट्रॅक्टिव्ह दिसतो. या जंपसूटला जॅकेटची डिझाईन त्याला जोडूनच दिलेली असते त्याने तुमचा लूक अजून आकर्षक दिसतो. पावसाळ्यात परिधान करण्यासाठी एकदम परफेक्ट आऊटफिट आहे.
लेअरिंग श्रग
लेअरिंग श्रग हा एक नवीन फॅशन ट्रेंड आहे. जिन्सवर स्लिव्हलेस टीशर्ट आणि ही श्रग तुम्ही परिधान केलं तर तुमचा लूक स्टायलिश दिसेल. या श्रगवर तुमचे फोटोसुद्धा उत्तम येतील. सध्या मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे श्रग पाहायला मिळतात. पावसाळ्यात तुमच्यासाठी हा श्रग लूक एकदम भारी दिसेल.
शॉर्ट फ्लोरल ड्रेस
तुम्ही जर पावसात बाहेर फिरण्यासाठी कारने जाणार असाल तर हा आऊटफिट तुमच्यासाठी उत्तम आहे. मुलींना किंवा महिलांना वनपीस परिधान करायला आवडत असेल किंवा शॉर्ट आऊटफिट कॅरी करायला जमत असेल तर त्यांनी हा आऊटफिट निवडायला हवा.
मॅक्सि ड्रेस
हा ड्रेस अतिशय आरामदायी असणारा आहे. तुम्ही कसाही कॅरी करू शकता. पावसाळ्यात तुमचा हा जॉर्जेटचा ड्रेस भिजला तरी तो लगेच कोरडा होऊ शकतो. या ड्रेसवर फोटोसुद्धा छान येतात. लॉन्ग ड्राइव्हसाठी परफेक्ट आऊटफिट आहे.
क्रॉप टॉप विथ फ्लेर्ड बॉटम्स
फ्लेर्ड जिन्सचा मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रेंड सुरु आहे. फ्लेर्ड जिन्सवर क्रॉप टॉप किंवा स्लिव्हलेस टॉप तुम्ही कशाही पद्धतीने वेअर करू शकता. जर तुम्ही राईडसाठी जाणार असाल तर तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आऊटफिट आहे.