Evening walk or morning walk : इव्हिनिंग वॉक की मॉर्निंग वॉक ? वजन कमी करण्यासाठी कोणत्या वेळी वॉक करावे.

मुंबई : आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे आहार आणि व्यायाम करणे फार महत्वाचे आहे. यासाठी दररोज चालायला जाणे हा एक सोपा पण खूप प्रभावी व्यायाम आहे. बऱ्याच लोकांना जिममध्ये तासंतास वर्कआऊट करण्यासाठी वेळ नसतो किंवा ते परवडत नाहीत. त्यामुळे अनेकजण वॉकला जाणे हाच एकमेव पर्याय निवडतात. पण सगळ्यांना हाच प्रश्न पडतो की सकाळी वॉकला जाणे की संध्याकाळी.


कारण ज्या लोकांचे ऑफिस सकाळच्या शिफ्टमध्ये असते ती लोकं संध्याकाळी वॉकला जाण्याची वेळ निवडतात. तर ज्यांची कामाची शिफ्ट संध्याकाळची असते, ते फक्त मॉर्निंग वॉकला जाण्याची वेळ निवडतात. तर वाढते वजन आणि पोटातील वाढते फॅट कमी करण्यासाठी कोणत्या वेळी वॉकला जाणे फायद्याचे ठरेल त्याबद्दल आपण आजच्या या लेखात जाणून घेऊयात…



सकाळी चालायला जाण्याचे फायदे


सकाळी चालायला जाणे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. कारण यामुळे तुमचे चयापचय क्रिया वाढते, ज्यामुळे कॅलरीज अधिक प्रभावीपणे बर्न होण्यास मदत होते आणि विशेषतः रिकाम्या पोटी फॅटचा वापर होतो. तसेच सकाळी चालणे हे तुमच्या शरीरातील एंडोर्फिन देखील वाढवते, मूड आणि मानसिक आरोग्य सुधारते, ज्यामुळे संपुर्ण दिवसासाठी काम करण्यासाठी शरीरात ऊर्जा तयार करतात. सकाळी चालायला जाणे यामध्ये सातत्य राखणे अनेकदा सोपे असते कारण ते इतर दैनंदिन जबाबदाऱ्या येण्यापूर्वी पूर्ण केले जाते.



संध्याकाळी चालायला जाण्याचे फायदे


रात्रीच्या जेवणानंतर काही वेळ बाहेर चालल्याने तुमची पचनक्रिया सुधारते, रक्तातील साखर नियंत्रित होते, रात्री उशिरा खाण्याची इच्छा कमी होते आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच संध्याकाळी चालल्याने तणाव कमी करण्याचे काम करतात, तसेच यामुळे कोर्टिसोलची पातळी देखील कमी होते आणि रिलॅक्सेशनला प्रोत्साहन देतात, ज्यामुळे आपल्या झोपण्याची गुणवत्ता सुधारते. संध्याकाळी चालणे देखील लवचिकता आणि सामाजिक संवादासाठी संधी प्रदान करते.



चालण्याची योग्य वेळ


सकाळी चालण्याची योग्य वेळ सहसा पहाटेची असते. कारण या वेळेस सूर्योदयानंतर लगेचच थंड वातावरणाचा आनंद घेता येतो. संध्याकाळी चालायला जाण्यासाठी वेळ साधारणत ६:०० ते ८:०० वाजेपर्यंत असते, ज्यामुळे जेवणानंतर आरामशीर चालायला मिळते.



सकाळी चालणे किंवा संध्याकाळी चालणे कोणते चांगले आहे?


चालण्यासाठी सर्वोत्तम वेळ तुमच्या स्वतःच्या गरजा आणि जीवनशैलीवर अवलंबून असते. सर्वोत्तम परिणामांसाठी, सकाळी आणि संध्याकाळी चालण्याचे खूप फायदे शरीराला मिळू शकतात. सकाळी चालण्याने ऊर्जा मिळते, तर संध्याकाळी चालण्याने आराम मिळतो. वेळ कोणतीही असो, प्रभावी वजन कमी करण्यासाठी आणि एकूण आरोग्यासाठी सातत्य आणि संतुलित आहार आवश्यक आहे. चुकीचा वेग, अस्वस्थ बूट, चालताना विश्रांती न घेणे आणि पाणी पिणे टाळणे या अशा चुका आहेत ज्या जास्तीत जास्त फायदा मिळविण्यासाठी टाळल्या पाहिजेत.

Comments
Add Comment

काशी विश्वनाथ मंदिराच्या पुजाऱ्यांच्या पगारात २०० टक्के वाढ

३० हजारांचा पगार थेट होणार ९० हजार लखनऊ (वृत्तसंस्था) : एक ऐतिहासिक निर्णय घेत, उत्तर प्रदेश सरकारने श्री काशी

कॉर्पोरेट कंपन्यांचा बँकेतून कर्ज घेण्याकडे नकारात्मक कौल

प्रतिनिधी: आरबीआयच्या नव्या आकडेवारीनुसार, कॉर्पोरेट कंपन्यांनी बँकांकडून कर्ज घेण्यात घसरण झाली आहे.

लाल समुद्रात ऑप्टिक केबल्स तुटल्याने इंटरनेट सेवा बाधित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लाल समुद्राखाली टाकलेल्या ऑप्टिक केबल्सना नुकसान झाले आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर

कोल्हापुरमध्ये १० वर्षांच्या मुलाचा मृत्यू, खेळता खेळता आला हृदयविकाराचा झटका, आईच्या मांडीवर घेतला अखेरचा श्वास

कोल्हापूर: महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तहसीलमधील कोडोली गावात एक दुःखद घटना घडली, श्रावण

परदेशातही गणेशोत्सव उत्साहात

बाप्पाचा जयघोष आणि गणेश विसर्जन सोहळ्याने परदेशी भूमीवर भारतीय संस्कृतीचे दर्शन क्वालालंपूर: भारतातील

भक्ती मयेकर खून प्रकरणात मोठा ट्विस्ट: आरोपी दुर्वास पाटीलच्या वडिलांचीही चौकशी, बारमधून महत्त्वाचा पुरावा जप्त

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील तिहेरी खून प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना एक मोठे यश मिळाले आहे. मुख्य