
दीपिका पदुकोण भारतातील लोकप्रिय अभिनेत्री तसेच ग्लोबल आयकॉन आहे. ती भारताची पहिली ग्लोबल लक्झरी ब्रँड अॅम्बॅसिडर झाली आहे. आंतरराष्ट्रीय लक्झरी विश्वात दीपिकाने देशाने नवी ओळख मिळवून दिली आहे. दीपिका म्हणजे अभिनय आणि फॅशन सेन्सचे अप्रतिम मिश्रण असल्याचे मत अनेकांनी ज्वेलरी इव्हेंट नंतर व्यक्त केले.
दीपिकाने २०१७ मध्ये एका ग्लोबल लक्झरी ब्रँडसाठी भारतीय चेहरा बनून इतिहास घडवला होता. हीच ती वेळ होती जिथून आंतरराष्ट्रीय लक्झरी ब्रँड्सनी भारतीय प्रतिभेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. तिच्या त्या पहिल्या टप्प्यानंतर अनेक भारतीय कलाकार आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर झळकू लागले.
दीपिकाच्या या नेमणुकीने जागतिक लक्झरी ब्रँड्सच्या विचारसरणीत मोठा बदल घडवून आणला, जिथे भारतालाही आता महत्त्व दिलं जातंय. अलीकडेच, दीपिका स्वीडनच्या स्टॉकहोममध्ये पार पडलेल्या EN ÉQUILIBRE या कार्टियर हाय ज्वेलरी इव्हेंटमध्ये सहभागी झाली. या इव्हेंटसाठी तिने एक रॉयल लाल ड्रेस परिधान केला होता, स्लीक आणि खुले केस ठेवले होते आणि कार्टियरची खास हाय ज्वेलरी घातली होती. तिच्यासोबत जोई सलदाना यांसारख्या आंतरराष्ट्रीय नामवंत सेलिब्रिटींचीही उपस्थिती होती.
या आधीही दीपिकाने अबू धाबी येथे झालेल्या कार्टियरच्या २५व्या वर्धापनदिनाच्या सेलिब्रेशनमध्ये भाग घेतला होता, जिथे ती कार्टियरच्या अमूल्य दागिन्यांमध्ये झळकली होती. स्टॉकहोममधील या उच्च दर्जाच्या गालासाठीही तिने कार्टियरच्या हाय-एंड ज्वेलरीचा ग्लॅमरस लुक निवडला.
फ्रेंच लक्झरी ब्रँड कार्टियरच्या ग्लोबल अॅम्बेसडरची भूमिका निभावणारी दीपिका ही पहिली भारतीय कलाकार आहे. या प्रतिष्ठित इव्हेंटमधील तिच्या उपस्थितीने पुन्हा एकदा तिच्या जागतिक प्रभावाची प्रचिती दिली आहे. तिच्या ताज्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असून चाहते तिच्या सौंदर्याने आणि आत्मविश्वासाने भारावून गेले आहेत.
दीपिका पदुकोणची ही जागतिक ओळख – जी तिच्या भारतीय संस्कृतीशी असलेल्या घट्ट नात्याने आणि दमदार चित्रपटांमधील भूमिकांमुळे घडली आहे – हिने आंतरराष्ट्रीय लक्झरी ब्रँड्सना भारतीय बाजारपेठेची खरी ताकद समजून घेण्यास भाग पाडले आहे. तिची जागतिक व्यासपीठावरील उपस्थिती हे दर्शवते की ती आंतरराष्ट्रीय लक्झरी वर्ल्डमध्ये सातत्याने आपली छाप सोडत आहे. कार्टियरच्या ग्लोबल अॅम्बेसडरच्या रूपात दीपिका आज भारतीय स्टाइल आणि ताकदीचं नेतृत्व करत नवा युग आरंभत आहे.