...... ५३८ हेक्टरवरील पिकेही बाधित
पालघर : पालघर जिल्ह्यात ६ व ७ मे रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे फळबागांना चांगलाच फटका बसला आहे. ५ हजार ६०० शेतकऱ्यांच्या २ हजार १६३ हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाले असून, १ हजार ९२३ शेतकऱ्यांच्या ५३८ हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांना मदत मिळावी म्हणून पालकमंत्री गणेश नाईक यांनी मत्स्यव्यवसाय मंत्री. नितेश राणे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीची मागणी केली आहे. जिल्ह्यात सहा व सात मे रोजी झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे २ हजारांहून अधिक घरांची पडझड झाली आहे. त्याचप्रमाणे धाकटी डहाणू येथील ९८ बोटींसह १०२ बोटीचे नुकसान झाले आहे.

नागरिकांना सर्तकतेचा इशारा बदलापूर : आधी उन्हाच्या झळांनी असह्य केले आणि आता ऐन उन्हाळ्यात बदलापूरसह अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपून जनजीवन ...
वसई तालुक्यातील अर्नाळा गाव, अर्नाळा किल्ला, पाचूबंदर तसेच पालघर तालुक्यातील ३ गावांमधील सुक्या मासळीचा व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या सुक्या मासळीचे नुकसान झाले आहे.घरांचे, शेती पिकांचे आणि फळबागांचे नुकसान झाल्यामुळे सर्वे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी दिले होते. नुकसानीचा सर्वे पूर्ण झाला असून वादळी वारा व पावसाचा फटका सर्वाधिक फळबागांना बसला आहे. २ हजार १६३ हेक्टर वरील फळबागांचे नुकसान वादळी वारा व पावसामुळे झाले आहे.
तसेच शेती पिकांसह घरांची सुद्धा मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना, मच्छीमार बांधवांना शासकीय मदत त्वरित मिळावी म्हणून, पालकमंत्री गणेश नाईक यांनी मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे ,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे २१ कोटींच्या निधीची मागणी केली आहे.
शुक्रवारच्या पावसाने १०३० घरांचे नुकसान
तीन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे सुद्धा जव्हार आणि विक्रमगड तालुक्यातील १०३० घरांचे नुकसान झाले आहे. निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. घरांचे नुकसान झालेल्या नागरिकांना सुद्धा लवकरच मदत करण्यात येणार आहे.