तांदुळासाठी प्रति क्विंटल किमान २,३६९ रुपये मिळतील. सरकारी निर्णयानुसार तांदुळाच्या किमान आधार मुल्यात ६९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना तूर डाळीसाठी प्रति क्विंटल किमान आठ हजार रुपये मिळतील. सरकारने तूर डाळीच्या किमान आधार मुल्यात ४५० रुपयांची वाढ केली आहे. उडदाच्या डाळीचे किमान आधार मूल्य ४०० रुपयांनी वाढवून ७,८०० रुपये करण्यात आले आहे. मूग डाळीचे किमान आधारमूल्य ८६ रुपयांनी वाढवून ८,७६८ रुपये करण्यात आले आहे. मोदी सरकारने सत्तेत आल्यापासून अकरा वर्षात तेलबिया, डाळी आणि कापसाच्या किमान आधार मुल्यात अर्थात एमएसपीमध्ये सुमारे पन्नास टक्के वाढ केली आहे. मोदी सरकार शेतकऱ्यांच्या उत्पन्ना दुपटीपेक्षा जास्त वाढ व्हावी यासाठी सतत प्रयत्न करत आहे.Cabinet Briefing by Union Minister @AshwiniVaishnaw @PIB_India https://t.co/sELNx6Sc27
— Ministry of Information and Broadcasting (@MIB_India) May 28, 2025
केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी आणखी एक निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डवर ४ टक्के व्याजदराने कर्ज मिळेल. याशिवाय, पायाभूत सुविधांच्या बाबतीतही सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. आंध्र प्रदेशातील बडवेल नेल्लोर ४ पदरी महामार्गाला मंजुरी देण्यात आली आहे. यासोबतच, रतलाम ते नागदा रेल्वे मार्गाचे चौपदरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातील वर्धा ते बल्लारशाह रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच आंध्र प्रदेशमधील बडवेल ते नेल्लोर या चौपदरी महामार्गाच्या प्रकल्पालाही मंजुरी देण्यात आली आहे. हा १०८ किमी. चा प्रकल्प आहे.






