
मुंबई : प्रसिद्ध गायक अरिजीत सिंगने बॉलिवूडमध्ये एकामागून एक हिट गाणी गायली आहेत. अरिजीत सिंगचे जगभरात असंख्य चाहते आहेत. अरिजित सिंगला पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार आणि इतर अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. आता अरिजीत इतिहास रचायला सज्ज झाला आहे.

स्टॉकहोम : स्टॉकहोममध्ये नुकत्याच झालेल्या कार्टियर इव्हेंटमधील दीपिका पदुकोणचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत. महागड्या ज्वेलरीच्या या इव्हेंटमध्ये ...
अरिजीत सिंग हा पहिला भारतीय कलाकार ठरणार आहे, जो यूकेमधील एका मोठ्या स्टेडियममध्ये मुख्य कलाकार म्हणून सादरीकरण करेल. त्याचा कॉन्सर्ट येत्या ५ सप्टेंबर २०२५ रोजी लंडनच्या प्रसिद्ध टॉटनहॅम हॉटस्पर स्टेडियममध्ये होणार आहे. हा एक अत्यंत महत्त्वाचा कॉन्सर्ट ठरणार आहे.
View this post on Instagram
आपल्या या ऐतिहासिक परफॉर्मन्सबाबत बोलताना अरिजीत म्हणाला, "मी फक्त एक सामान्य माणूस आहे जो गाणे गातो. लंडनमध्ये परत गाण्याची संधी मिळणं ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. जर मी इतिहास रचणार असेल, तर मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो". अरिजीत हा सध्या spotify वर जगातील सर्वाधिक फॉलोवर्स असलेला गायक असून त्यांनी टेलर स्विफ्ट, एड शीरन यांनाही मागे टाकलं आहे. आपल्या सुरेल आवाजानं तो कोट्यवधी लोकांच्या मनावर राज्य करतो.