
५७ लाखांचा गंडा घालणारा ६२ वर्षीय ठग फरार, पुण्यात घर घेण्याच्या नावाखाली लुटलं!
ठाणे : 'लग्न करून सुखसमृद्ध आयुष्य जगू', असे सांगत पुण्याच्या एका ६२ वर्षीय भामट्याने ७३ वर्षांच्या महिलेला तब्बल ५७ लाखांना गंडवले आहे. सध्या हा आरोपी फरार असून ठाणे पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.
डोंबिवलीतील नाना शंकरशेठ रोडवरील पीडित महिलेला हा आरोपी वधूवर सूचना जाहिरातीद्वारे भेटला. प्रेमाचे नाट्य रंगवत त्याने लग्नाचं वचन दिलं आणि पुण्यात घर घेण्यासाठी ३५ लाख रुपये तिच्याकडून घेतले. यासाठी बोगस कागदपत्रं आणि बनावट पावत्या वापरल्या.

पुणे : 'शिक्षणाचं माहेरघर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात शिक्षण खात्यातील भ्रष्टाचाराचा नवा भंडाफोड झालाय. मुलांना २५% मोफत शिक्षण देणारी योजना (RTE) ...
यानंतर तो महिलेकडे राहायला आला आणि सुमारे २० लाखांचे सोने लंपास केले. इतकंच नव्हे, तर तिचे डेबिट कार्ड वापरून २.४ लाख काढले आणि शेवटी गायब झाला.
फसवणूक झालेल्या महिलेने यासंदर्भात विश्रू नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम ३१६(२), ३१८(२), ३०५, ३३६(२)(३), ३३८ आणि ३४०(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक विवेक कुमुतकर म्हणाले, 'आम्ही सखोल तपास करत असून आरोपीचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.'