Tomato Crop Damaged: विठेवाडी शिवारात वीज पडून टोमॅटो रोपाचे नुकसान

देवळा : सोमवारी (दि. २६) रात्री विठेवाडी शिवारात विजेच्या कडकडाट तसेच वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी इलेक्ट्रीक पोल व झाडे उन्मळून पडली आहेत.


विठेवाडी येथील आहेर वस्तीजवळील शेतात बाजीराव राघो निकम यांच्या नवीनच लागवड केलेल्या टोमॅटोच्या शेतात वीज कोसळली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. परंतु, एक एकर क्षेत्रातील टोमॅटो रोपाचे नुकसान झाले आहे. त्यातील ३०० ते ३५० लहान रोपे जळून गेली आहेत. तहसील विभागाने तातडीने पंचनामा करून अहवाल पुढील कार्यवाहीसाठी पाठवला.


गेल्या चार - पाच दिवसात मेघ गर्जनेसह झालेल्या अवकाळी पावसामुळे विठेवाडी परिसरात अनेक ठिकाणी इलेक्ट्रीक पोल कोलमडून पडले आहेत. पावसाळ्यापूर्वी एक महिना आधीच प्रत्येक गावात व शिवारात असलेल्या महावितरणच्या विद्युत वाहिनीच्या तारांना अडथळा येऊ नये म्हणून देखभालीसाठी तांत्रिक ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली असून देखील विठेवाडी परिसरात अद्याप ठेकेदाराची यंत्रणा पोहोचलेली नाही.

Comments
Add Comment

Astronaut Anil Menon : भारतीय वंशाचे अंतराळवीर अनिल मेनन अंतराळ मोहिमेसाठी १४ जुलैला होणार रवाना

कझाकस्तान : भारतीय वंशाचे अंतराळवीर अनिल मेनन हे १४ जुलै रोजी कझाकस्तानमधील बैकोनूर कॉस्मोड्रोम येथून

मध्य रेल्वेतर्फे 'उर्स' उत्सवासाठी ४ अनारक्षित विशेष गाड्या

मुंबई : 'उर्स' उत्सवासाठी प्रवाशांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन, मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज

Jalgaon : जळगाव-इंदूर विमानसेवेच्या हालचालींना पुन्हा वेग; डीजीसीएकडे तिसऱ्यांदा प्रस्ताव, लवकरच उड्डाणाची शक्यता

Jalgaon : जळगावकरांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या जळगाव-इंदूर थेट विमानसेवेच्या

Nashik : येवल्यात भरधाव कंटेनरची दुचाकीला जोरदार धडक; ७७ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू

Nashik : येवला शहरातील विंचूर चौफुली परिसरात आसरा हॉटेलजवळ गुरुवारी झालेल्या भीषण रस्ता अपघातात पिंपळगाव जलाल येथील

Mhada: म्हाडातर्फे १३ जुलै रोजी १९ वा लोकशाही दिन साजरा होणार

मुंबई(Mumbai) : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (Mhada) एकोणीसावा लोकशाही दिन सोमवार १३ जुलै २०२६

Lote MIDC : लोटे एमआयडीसीतील रसायन गळतीने खळबळ, एमपीसीबीकडून सहा कारखान्यांना उत्पादन बंदीची दिली नोटीस

खेड : तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, औद्योगिक वसाहतीतील एका