Tomato Crop Damaged: विठेवाडी शिवारात वीज पडून टोमॅटो रोपाचे नुकसान

देवळा : सोमवारी (दि. २६) रात्री विठेवाडी शिवारात विजेच्या कडकडाट तसेच वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी इलेक्ट्रीक पोल व झाडे उन्मळून पडली आहेत.


विठेवाडी येथील आहेर वस्तीजवळील शेतात बाजीराव राघो निकम यांच्या नवीनच लागवड केलेल्या टोमॅटोच्या शेतात वीज कोसळली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. परंतु, एक एकर क्षेत्रातील टोमॅटो रोपाचे नुकसान झाले आहे. त्यातील ३०० ते ३५० लहान रोपे जळून गेली आहेत. तहसील विभागाने तातडीने पंचनामा करून अहवाल पुढील कार्यवाहीसाठी पाठवला.


गेल्या चार - पाच दिवसात मेघ गर्जनेसह झालेल्या अवकाळी पावसामुळे विठेवाडी परिसरात अनेक ठिकाणी इलेक्ट्रीक पोल कोलमडून पडले आहेत. पावसाळ्यापूर्वी एक महिना आधीच प्रत्येक गावात व शिवारात असलेल्या महावितरणच्या विद्युत वाहिनीच्या तारांना अडथळा येऊ नये म्हणून देखभालीसाठी तांत्रिक ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली असून देखील विठेवाडी परिसरात अद्याप ठेकेदाराची यंत्रणा पोहोचलेली नाही.

Comments
Add Comment

हत्ती हटेना... वनविभाग पथक हतबल!

गोवा वन खात्याचे पथक सिंधुदुर्ग सीमेवर सतर्क ओंकार हत्ती आज दिवसभर नेतर्डे परिसरात ठाण मांडून असल्याने गोवा

सात वर्षांच्या बांधकामांनंतर खड्डेमय ‘पलावा’चे उद्घाटन

७२ कोटींच्या खर्चानंतरही उड्डाणपुलाला ‘निसरडा भागा’ची उपमा मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील कल्याण-शीळ

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व

अमेरिका रशियावर कठोर निर्बंध लादणार

नाटोला चीनवर ५० ते १०० टक्के टॅरिफ लादण्याची मागणी वॉशिंग्टन डीसी (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

मुंबईकरांना यंदा पाण्याचे ‘नो टेन्शन’

पुरवठा करणाऱ्या धरण, तलाव क्षेत्रांतील पाणीसाठा ९८.४० टक्के शेवटच्या १७ दिवसांत १.६० टक्के साठ्याचे