
वन्य प्राण्यांकडून होणारे शेतीचे नुकसान आणि त्यावरील उपाययोजना यादृष्टीने महत्वपूर्ण चर्चा
मालवण : कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात वन्य प्राण्यांकडून होणारे शेतीचे नुकसान आणि त्यावरील उपाययोजनांबाबत आमदार निलेश राणे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांची मंत्रालय येथे भेट घेतली. यावेळी विविध महत्वपूर्ण विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.
या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी वन विभागातील अधिकाऱ्यांना आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देणे आणि शेतीचे नुकसान रोखण्यासाठी योग्य उपाययोजना राबवणे यावर भर देण्यात आला.

खासदार नारायण राणे यांचा विरोधकांवर जोरदार प्रहार! मुंबई: भाजप खासदार नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे ...
वन्य प्राण्यांकडून मोठया प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान होत आहेत. त्यावरील उपाययोजनांबाबत प्रधान्याने चर्चा करण्यात आली. शेकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने अनेक मुद्दे यावेळी आमदार निलेश राणे यांनी उपस्थित केले.