
या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने पहिल्यांदा फलंदाजी केली. यावेळेस पंतने ठोकलेल्या शतकी खेळीच्या जोरावर लखनऊने पहिल्यांदा फलंदाजी करताना २१७ धावा केल्या आहेत.
पंतने आरसीबीविरुद्ध नाबाद ११८ धावा तडकावल्या. यादरम्यान त्याने ११ चौकार आणि ८ षटकार ठोकले. त्याच्या या जबरदस्त खेळीच्या जोरावर लखनऊला २२७ धावांचा डोंगर उभारता आला.
लखनऊची सुरूवात दमदार झाली. सलामीवीर मिचेल मार्शने ६७ धावा ठोकल्या. मॅथ्यू ब्रीट्झ्केने १४ धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या पंतने फटकेबाजी करायला सुरूवात केली. त्याने ६१ बॉलमध्ये ११८ धावांची खेळी केली.
संपूर्ण हंगामात लखनऊचा पंत फॉर्ममध्ये दिसत नव्हता. मात्र आज त्याची लय काही वेगळीच आहे. त्याने १०व्या षटकांत २९ बॉलमध्ये अर्धशतक ठोकले. यासोबतच लखनऊची धावसंख्या १०० पार पोहोचवली. त्यानंतर १४व्या षटकांत मिचेल मार्शने ३१ बॉलमध्ये अर्धशतक ठोकले. हे त्याचे या हंगामातील सहावे अर्धशतक होते. ऋषभ पंतने १८व्या षटकांत ५४ बॉलमध्ये शतक ठोकले. त्याच्या खेळीच्या जोरावर लखनऊची धावसंख्या २०० पार पोहोचली.