Monday, October 27, 2025
Happy Diwali

Vani News: चोरट्यांच्या हल्ल्यात चार मेंढपाळ जखमी; चाैघे अटकेत

Vani News: चोरट्यांच्या हल्ल्यात चार मेंढपाळ जखमी; चाैघे अटकेत

वणी:  दिंडोरी तालुक्यातील भोकरपाडा येथील मोकळ्या जागेत अज्ञात सहा लोकांनी शेळ्या आणि मेंढ्या चोरण्याच्या उद्देशाने मारहाण केली. यात चारजण जखमी झाले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी चौघा आरोपींना अटक केली आहे. त्यांना वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

२५ मे रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास भोकरपाडा येथील मोकळ्या जागेत तात्पुरत्या स्वरूपात वस्ती करून राहणाऱ्या नांदगाव तालुक्यातील मेंढपाळांवर अचानक पिकअप गाडीतून येऊन सहा जणांच्या टोळक्याने मेंढ्या चोरण्याच्या हेतूने मारहाण केली. यात दुर्योधन समाधान वाघमोडे (वय ३०), श्रावण समाधान वाघमोडे (वय ३४), बाळा समाधान वाघमोडे (वय १९), ताराबाई शांताराम शिंदे (वय २८, सर्व रा. दहेगांव ता. नांदगाव) यांच्यावर हल्ला करून जबर मारहाण करत एक शेळी व दोन मोबाईल चोरून नेले. यात चौघे जखमी झाले आहेत. यातील काहींच्या डोक्यावर मोठ्या प्रमाणात जखमा आहेत. रात्री तातडीने वणी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. गंभीर जखमींवर डाॅ.नेहा सिंघल व आरोग्य कर्मचारी दिनेश कडवे, काशीनाथ गावित, कन्हैया शर्मा व परिचारिका शैला गावित, सविता ससाणे यांनी तातडीने उपचार केले.

या प्रकरणात पोलिसांनी चौघा आरोपींना अटक केली आहे. यात एक विधीसंघर्षित आहे. दोन आरोपी अद्याप फरार आहेत. समाधान संजय कोकाटे (वय २५), आदेश मोहन वटाणे (वय १९) व रमेश धनराज वटाणे (वय २५, सर्व रा. टिटवे ता. दिंडोरी) यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता २८मेपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा