फादर ऑफ इस्लामिक बॉम्ब!

  74

अभय गोखले - ज्येष्ठ विश्लेषक


१९७४ साली भारताने अणुचाचणी यशस्वीपणे पार पाडल्यानंतर पाकिस्तानला स्वतःच्या सुरक्षिततेविषयी चिंता वाटू लागली. त्यानंतर पाकिस्तान त्या बाबतीत स्वस्थ बसणे शक्यच नव्हते. पाकिस्तानचे त्यादृष्टीने गुप्तपणे प्रयत्न सुरूच होते. ज्या देशाशी (भारताशी) पाकिस्तानने तीन युद्धे लढली होती, त्या देशाकडे अणुबॉम्ब असणे ही गोष्ट पाकिस्तानची झोप उडवणारी होती.


पाकिस्तानची अमेरिकेबरोबर घट्ट मैत्री असली तरी त्यांच्याकडून मिळणाऱ्या संरक्षणावर संपूर्णपणे अवलंबून राहणे योग्य नव्हते. त्यातच ११ आणि १३ मे १९९८ रोजी भारताने पुन्हा एकदा आपली अणुचाचणी यशस्वीपणे पार पाडल्यानंतर, पाकिस्तान स्वस्थ बसणे शक्यच नव्हते. पाकिस्तानने त्यानंतर १५ दिवसांनी म्हणजे २८ आणि ३० मे रोजी आपली पहिली अणुचाचणी यशस्वीपणे पार पाडली आणि संपूर्ण जगाला आश्चर्याचा धक्का दिला. अशाप्रकारे अणुचाचणी यशस्वीपणे पार पाडणारा पाकिस्तान हा जगातील पहिला मुस्लीम देश ठरला.


पाकिस्तानच्या अणुबॉम्बचे जनक होते, डॉ. अब्दुल कादीर खान. ए. क्यू. खान या नावाने पाकिस्तानमध्ये सुप्रसिद्ध असलेले अब्दुल कादीर खान हे एका रात्रीत पाकिस्तानी जनतेचे हिरो बनले. ‘फादर ऑफ इस्लामिक बॉम्ब’ या उपाधीने ते जगभर ओळखले जाऊ लागले.


डॉ. अब्दुल कादीर खान यांचा जन्म १९३६ साली भारतातील भोपाळ (मध्य प्रदेश) येथे झाला होता. डॉ. खान यांचे वडील अब्दुल गफूर खान हे ब्रिटिश सरकारच्या शिक्षण मंत्रालयात एक अधिकारी म्हणून काम करत होते. १९४७ साली जेव्हा भारताची फाळणी झाली तेव्हा डॉ. खान यांचे कुटुंब पाकिस्तानमधील कराची या ठिकाणी स्थलांतरित झाले. डॉ. खान यांचे सुरुवातीचे शिक्षण लाहोर येथे झाले.त्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्यांनी कराची येथील एका कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर डॉ. खान यांनी कराची मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशनमध्ये नोकरी पत्करली.


१९६१ साली मेटॅलर्जिकल इंजिनीअरिंगचा अभ्यास करण्यासाठी डॉ. खान यांनी टेक्निकल युनिव्हर्सिटी बर्लिन येथे प्रवेश घेतला. १९७२ साली डॉ. खान, ॲमस्टर्डम येथील फीजिक्स डायनामिक्स रिसर्च लॅबोरेटरीमध्ये सीनियर स्टाफ म्हणून रूजू झाले.ते फिजिक्स लॅबोरेटरीमध्ये काम करत असताना, युरेन्को ग्रुपने त्यांना सीनियर सायंटिफिक स्टाफमध्ये जॉईन होण्याची ऑफर दिली. ती ऑफर डॉ. खान यांनी आनंदाने स्वीकारली. युरेन्को ग्रुपमध्ये डॉ. खान यांच्याकडे सोपविण्यात आलेली जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली.


त्याच सुमारास म्हणजे जानेवारी १९७२ मध्ये पाकिस्तानने ‘ॲटोमिक बॉम्ब प्रोजेक्ट’ सुरू करण्याचा गुप्तपणे निर्णय घेतला होता. पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान झुल्फिकार अली भुत्तो यांच्या अध्यक्षतेखाली मुलतान येथे काही शास्त्रज्ञांबरोबर झालेल्या गुप्त बैठकीतवरील निर्णय घेण्यात आला होता. ॲटोमिक बॉम्ब प्रोजेक्ट हा भुत्तो यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली, तसेच पाकिस्तान ॲटोमिक एनर्जी कमिशनचे अध्यक्ष मुनीर अहमद खान यांच्या नियंत्रणाखाली राहणार होता. मुनीर अहमद खान यांनी ‘ प्रोजेक्ट - ७०६’ या सांकेतिक नावाखाली युरेनियम एनरिचमेंट प्रोग्रॅमला सुरुवात केली होती. त्यावेळी ए.क्यू.खान हे नेदरलँडमध्ये युरेनियम एनरिचमेंट फॅसिलिटीत काम करत होते. १९७५ साली त्यांनी पाकिस्तान सरकारसाठी काम करण्याची आपली इच्छा प्रकट केली. पाकिस्तान सरकारने त्यांना पाकिस्तानमध्ये परतण्याची विनंती केली. त्यांनी पाकिस्तानमध्ये परतताना आपल्या बरोबर सेंट्रिफ्युजची ड्रॉइंग्ज आणली होती.


त्यानंतर पाकिस्तानने खान यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या न्युक्लियर एनरिचमेंट फॅसिलिटीमध्ये ती सेंट्रिफ्युजेस ॲसेंबल केली. त्यानंतर युरोपमधील काही विकसित देशांकडून पाकिस्तानने अणुविषयक सामग्री आणि तंत्रज्ञान भूमिगत नेटवर्कच्याद्वारे प्राप्त केले. पाकिस्तानने आपला अणुविषयक कार्यक्रम अतिशय गुप्त राखला होता.


१९७० च्या दशकात अणुविषयक कार्यक्रम तत्कालीन पंतप्रधान झुल्फिकार अली भुत्तो यांच्या देखरेखीखाली होता.झुल्फिकार अली भुत्तो हे या बाबतीत ए. क्यू. खान यांच्याशी थेट संपर्क राखून होते. ए. क्यू खान जितका मागतील तितका निधी त्यांना पुरवण्यात येत होता. त्याचे कोणतेही ऑडिट ठेवण्यात आले नव्हते. या कार्यक्रमाची सुरक्षा ए. क्यू. खान यांच्यावर सोपवण्यात आली होती.


त्यानंतर झिया उल हक यांनी जेव्हा पाकिस्तानची सत्ता ताब्यात घेतली तेव्हा त्यांनीही ए. क्यू खान यांच्याशी थेट संपर्क ठेवला होता. १९८८ साली विमान अपघातात झिया यांचा मृत्यू झाल्यानंतर पाकिस्तानचे तत्कालीन अध्यक्ष गुलाम इशाक खान यांनी ती जबाबदारी लष्करप्रमुखांकडे सोपवली. त्यानंतर ए. क्यू. खान यांच्याशी थेट संपर्क साधण्याचे काम लष्करप्रमुख पाहू लागले.

Comments
Add Comment

बेस्टची वैभवशाली सेवा आणि भवितव्य

येत्या गुरुवारी ७ ऑगस्ट रोजी बेस्ट उपक्रमाचा ७८वा वर्धापन दिन आहे. बेस्ट (बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन

खड्ड्यांच्या शापातून रस्त्यांना मुक्ती कधी?

कोणत्याही कामाचे योग्य प्रकारे नियोजन केले तर त्याची दुरवस्था होत नाही. विशेषत: राज्यातील रस्त्यांच्या

धार्मिक, ऐतिहासिक वारसा लाभलेले पालघर

कोकणच्या उत्तर भागात पूर्वेकडे सह्याद्री पर्वतरांगा, पश्चिमेकडे अरबी समुद्रा दरम्यान पसरलेला आहे. पालघर

ओझोनमुळे कोंडला महानगरांचा श्वास

उन्हाळ्यात प्रमुख महानगरांमध्ये जमिनीजवळील ओझोन प्रदूषण लक्षणीयरीत्या वाढले. गेल्या वर्षीच्या उन्हाळ्याच्या

दुसरं लग्न करताय? सावध राहा!!

मीनाक्षी जगदाळे आपल्या समाजरचनेत दिवसेंदिवस जे चुकीचे बदल घडत आहेत, विवाहबाह्य संबंध, त्यातून गुन्हेगारीचा उदय

मग बॉम्बस्फोट केले कोणी?

शंतनु चिंचाळकर दहशतवाद्यांनी मुंबईची लाईफलाईन असलेल्या सात लोकल ट्रेनमध्ये प्रेशर कुकरच्या साह्याने