
गेल्या दोन वर्षांपासून जामखेड शहारातील राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडलेले असून या रखडलेल्या कामामुळे जामखेड शहर तालुका व पर जिल्ह्यातील येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना हाल सहन करावे लागत आहेत. तसेच या रखडलेल्या कामामळे अनेक मोटारसायकल चालकांचे अपघात होऊन हात मोडणे, पाय मोडणे, अशा अनेक घटना दोन वर्षात घडल्या आहेत. जून महिन्यात सर्व शाळा विद्यालय सुरु होत आहेत. पावसाळा सुरु झाल्यामुळे रस्त्यावरती चिखलाचे साम्राज्य झाले आहे. रखडलेल्या कामामुळे नागरिकांचे आणि विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. प्रशासनाने रस्त्याचे काम २९ मे गुरुवार पर्यंत पूर्ण करावे नाहीतर आंदोलन करू आणि त्या आंदोलनाला प्रशासन जबाबदार राहील असे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेने जाहीर केले आहे.