Tuesday, May 27, 2025

ताज्या घडामोडीरायगड

मुरबाड माळशेज घाटात वाहतूक सुरळीतपणे सुरू

मुरबाड माळशेज घाटात वाहतूक सुरळीतपणे सुरू

मुरबाड :मुरबाड माळशेज घाट राष्ट्रीय महामार्गावर माळशेज घाटात रस्त्यालगत दरड कोसळल्याची घटना घडली होती. येथे कोणत्या प्रकारची जीवितहानी घडली नाही. राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकाम विभागाच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यानंतर तत्काळ दरड बाजूला करण्यात आली. त्यानंतर आता मुरबाड माळशेज घाटात सुरळीतपणे दोन्ही बाजूने वाहतूक सुरू आहे. तसेच घाटात खरा पाऊस जून महिन्यात पडत असतो; परंतु येथे मात्र मे महिन्यातच पावसाळ सुरू झाला आहे.



गुरुवारी पहाटेच्या दरम्यान दरड कोसळल्याची घटना घडली होती; परंतु घाटामध्ये राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे सतर्क कर्मचारी असल्याने दिसून येत आहे. कारण तेथे छोटे-मोठे दगड पडले तर त्यांना तत्काळ हलवण्यासाठी बांधकाम विभागाच्या वतीने जेसीबी/ ट्रॅक्टर इतर साहित्य तैनात करण्यात आले आहे; परंतु माळशेज घाटात रस्त्याचे काम चालू आहे त्यामुळे जाताना/येताना वाहनचालक, प्रवासी व मोटर सायकल स्वार यांनी आपल्या स्वतःची काळजी घेऊन घाटात प्रवास करावा असे आवाहन माळशेज घाट महामार्ग पोलीसांच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments
Add Comment