Pandharpur Rain : पंढरपुरात पूजेसाठी गेलेले तीन महाराज मंदिरात अडकले अन्...
May 26, 2025 12:24 PM 136
पंढरपूर : पावसाने धुमाकूळ घालत सगळीकडेचं दणक्यात हजेरी लावली आहे. अशातच पंढरपूर तालुक्यात (Pandharpur News) मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरु असल्याने भीमा नदीची (Bhima River) पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातच आता एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. गुरसाळे येथे भीमा नदी पात्रात असलेल्या महादेव मंदिरात (Mahadev Mandir) ३ महाराज अडकल्याचे समोर येत आहे. आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management) पथकाकडून बचावकार्य सुरु करण्यात आले आहे.
सुभाष ढवन, विठ्ठल लोहकरे आणि जाधव महाराज असे या महाराजांची नावे आहेत. आज सकाळी पूजेसाठी हे ३ महाराज मंदिरात गेले होते. मात्र त्यानंतर पाणी वाढत गेलं आणि त्यांना बाहेर येता आले नाही. त्यानंतर त्यांनी मदतीला गावकऱ्यांना सांगितल्यावर गावकऱ्यांनी प्रशासनाची संपर्क साधला.
खेड : रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून, त्याचा परिणाम दापोली-खेड प्रमुख राज्य मार्गावर दिसून आला आहे. खेड तालुक्यातील फुरुस गावाजवळ ...
आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून बचावकार्य सुरु
थोड्याच वेळात आपत्ती व्यवस्थापनाची टीम घटनास्थळी दाखल झाली. हे तीन महाराज सुरक्षित असल्याची माहिती समोर येत आहे. तीनही महाराज मंदिराच्या बाहेरच आहेत. मंदिर चढावर असल्यामुळे तिथे अजून पाणी पोहोचलेल नाही, मात्र त्यांना बाहेर येता येत नसल्यामुळे त्यांना काढण्यासाठी आता आपत्ती व्यवस्थापनाची टीम पोहोचली आहे. पुढच्या काही वेळात या तिनही महाराजांना सुरक्षित रितीने बाहेर काढले जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.